Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, १९ ऑक्टोबर, २०२६

अकलूजमध्ये जैन सोशल ग्रुप व संगिनी फोरमतर्फे दांडिया व रासगरबा महोत्सव उत्साहात साजरा*

*अकलूज प्रतिनिधी* *केदार लोहकरे* *टाइम्स 45 न्यूज मराठी*
जैन सोशल ग्रुप अकलूज व संगिनी फोरम अकलूज यांच्या संयुक्त विद्यमाने कांतीलाल सांस्कृतिक भवन शंकरनगर- अकलूज येथे दांडिया व रासगरबा महोत्सव २०२६ तसेच कोजागिरी पौर्णिमा महोत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले होते. आपली पारंपरिक संस्कृतीचे जतन करणे तसेच मनोरंजन आणि सामाजिक एकोपा साधणारा हा अनोखा सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात व आनंदी वातावरणात पार पडला
. या कार्यक्रमाचे नियोजन जैन सोशल ग्रुप अकलूजचे अध्यक्ष सीए अमित दोशी,सचिव गौरव फडे, संगिनी फोरमच्या अध्यक्षा सौ.भक्ती वैद्य व सचिव सौ.अर्पिता गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. सर्व पदाधिकारी व सदस्यांच्या नियोजनबद्ध प्रयत्नांमुळे कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.या कार्यक्रमात सहभागासाठी विविध वयोगटांनुसार स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये ५ ते १० वर्षे वयोगट,१० ते १५ वर्षे वयोगट,खुला गट तसेच जोडीदार गट अशा विविध गटांचा समावेश होता.पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेल्या सदस्यांनी दांडिया व रासगर्बाच्या तालावर ठेका धरत कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटला.विविध गटांतील स्पर्धांमुळे लहान मुलांपासून प्रौढांपर्यंत सर्वांना आपले कौशल्य सादर करण्याची संधी मिळाली.सर्व विजेतांना बक्षिसे व ट्रॉफी देण्यात आली.या कार्यक्रमासाठी परीक्षक म्हणून सौ नेहा फडे तसेच सौ प्रतीक्षा काळेल लाभले.
कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वांसाठी स्वादिष्ट भोजनाची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती तसेच कोजागिरी पौर्णिमेचे औचित्य साधून पारंपरिक मसाला दुधाचीही व्यवस्था करण्यात आली होती.सांस्कृतिक कार्यक्रमासोबतच भोजन व कोजागिरीच्या दुधाचा आस्वाद घेत उपस्थितांनी या सोहळ्याचा आनंद द्विगुणित केला.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पियुष दोशी,अमेय व्होरा,शितल व्होरा,डॉ.निलेश फडे,विरन गांधी, राहुल व्होरा,धवल गांधी,अन्वित गांधी,आनंद देसाई यांनी विशेष सहकार्य केले.तसेच संगिनी फोरमच्या वतीने सौ.सपना दोशी, डॉ.मानसी गांधी सौ.श्रुती फडे, सौ.अमृता गांधी,सौ.रिया गांधी, सौ.मेघना फडे,सौ.नितुजा चंकेश्वरा,सौ.सेजल दोशी सौ. काजल खिवंसरा,सौ.प्राची चंकेश्वरा,सौ.कोमल व्होरा यांच्यासह इतर सदस्यांनी कार्यक्रमाच्या आयोजनासाठी मोलाचे योगदान दिले.
*चौकट* जैन सोशल ग्रुप अकलूज व संगिनी फोरम अकलूज यांच्या संयुक्त प्रयत्नांतून आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवामुळे अकलूजमधील सामाजिक व सांस्कृतिक वातावरण अधिक समृद्ध झाले. पारंपरिक खेळ,कला,कौटुंबिक सहभाग,आनंद आणि सामाजिक एकोपा यांचा सुंदर संगम असलेला हा कार्यक्रम उपस्थितांच्या स्मरणात राहील. सौ.भक्ती वैद्य अध्यक्षा,संगिनी फोरम अकलूज

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा