Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, १९ ऑक्टोबर, २०२६

योग प्राणायाम ही सुखी जीवनाची आदर्श गुरुकिल्ली: दत्तात्रय अनपट. हरिद्वार येथे मुख्य योगशिक्षक प्रशिक्षण पूर्ण करून परतलेल्या ११ योगशिक्षकांचा पतंजली योग समितीतर्फे सन्मान.

इंदापूर, डॉ. संदेश शहा. टाईम्स 45 न्यूज मराठी सहसंपादक मो. ९९२२४१९१५९ सोमवार, १९ ऑक्टोबर २६
इंदापूर तालुका पतंजली योग समिती च्या वतीने पतंजली योगपीठ, हरिद्वार येथे परम पूज्य स्वामी रामदेव महाराज, पूज्य स्वामी परमार्थ देव यांचे कृपा आशीर्वादाखाली मुख्य योगशिक्षक प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण करून परतलेल्या इंदापूर तालुक्यातील ८ योगशिक्षक बंधू व ३ योगशिक्षक भगिनी अशा एकूण ११ योगशिक्षकांचा रविवार, दि. १८ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ६.३० वाजता शहा सांस्कृतिक भवन, इंदापूर येथे सन्मान करण्यात आला. प्रशिक्षणासाठी गेलेले पतंजली योगपिठ हरिद्वार प्रशिक्षणार्थी दशरथ मोरे, विलास गायकवाड, भाऊसाहेब शिंदे, लहू गाढवे, राजेंद्र सरडे, दत्तात्रय मदने, विजयकुमार फलफले, अतुल घोगरे, सौ. मंगलताई वाघ, सौ. अनुजा शिंदे आणि सौ. नीता नलवडे यांचा पतंजली योग परिवाराच्या वतीने इंदापूर तहसील प्रभारी दतात्रय अनपट यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी दत्तात्रय अनपट म्हणाले, सध्याच्या स्पर्धेच्या युगात दैनंदिन योग प्राणायाम करणे ही सुखी जीवन जगण्यासाठी आदर्श गुरुकिल्ली आहे. इंदापूर पतंजली योग समितीच्या माध्यमातून गेल्या २२ वर्षांपासून योग, प्राणायाम आणि आरोग्यविषयक जनजागृतीचे कार्य सातत्याने सुरू आहे. नागरिकांनी नियमित योगसाधना करून निरोगी जीवन जगावे आणि योगाचे महत्त्व घराघरांत पोहोचावे, या उद्देशाने समितीचे योगशिक्षक निःस्वार्थपणे कार्यरत आहेत. इंदापूर तालुक्यातील या ११ योगशिक्षकांपैकी 3 योग शिक्षक भगिनी यांचे २० ऑगस्ट ते २४ ऑगष्ट २०२६ व ८ योग शिक्षक बंधू यांचे दि. ७ ते ११ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत पतंजली योगपीठ, हरिद्वार येथे योग प्रशिक्षण संपन्न झाले. प्रशिक्षणादरम्यान प्राप्त केलेले योगज्ञान आणि कौशल्य यांचा उपयोग आता इंदापूर तालुक्यातील योगप्रसारासाठी होणार आहे. या योगशिक्षकांचा सन्मान करताना त्यांच्या योगक्षेत्रातील योगदानाचे देखील कौतुक करण्यात आले. या प्रशिक्षणामुळे इंदापूर तालुक्यातील योग चळवळीला अधिक गती मिळेल आणि अधिकाधिक नागरिक योगसाधनेकडे वळतील, असा विश्वास यानिमित्त व्यक्त करण्यात आला. “योग करा, निरोगी राहा आणि योगाचा संदेश घरोघरी पोहोचवा,” या संदेशातून उपस्थितांना नियमित योगसाधनेचे महत्त्व पटवून देण्यात आले. प्रशिक्षण पूर्ण करून परतलेल्या सर्व योगशिक्षकांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील योगप्रसार कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. या कार्यक्रमातून पतंजली योग समिती इंदापूरचा योगप्रसाराचा संकल्प अधिक दृढ झाला असल्याचे नूतन योग प्रशिक्षक विजयकुमार फलफले यांनी सांगितले. हरिद्वार येथील मुख्य योगशिक्षक शिबिरासाठी पतंजली पश्चिम महाराष्ट्र सोशल मीडिया राज्य प्रभारी व पिंपरी चिंचवडचे पालक प्रभारी आचार्य अविनाश व युवा राज्य प्रभारी अतुल आर्य, मा. जिल्हा प्रभारी उत्तरेश्वर तोडकर, डॉ. नारायण हुले, जनार्दन पांडे, इंदापूर तहसील प्रभारी दतात्रय अनपट व पतंजली योग परीवार, इंदापूर तालुका यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा