Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, २० नोव्हेंबर, २०२६

धर्मापलीकडची माणुसकी! मुस्लिम बांधवांकडून हिंदू बांधवांना दिवाळी फराळ; प्रदिप गारटकर यांच्या सहकार्याने इंदापूरात राष्ट्रीय एकात्मता, सर्वधर्मसमभाव सामाजिक ऐक्याचा संदेश!

 इंदापूर, डॉ. संदेश शहा.

टाईम्स 45 न्यूज मराठी सहसंपादक मो. ९९२२४१९१५९


भारतीय संस्कृतीत सण आणि उत्सव ही चैतन्य प्रतीक असून दीपावली सणास सणाचा राजा म्हणून ओळखले जाते. दीपावलीचा सण म्हणजे  आनंद, प्रेम, आपुलकी आणि बंधुभाव संवर्धित करण्याचा सण. या सणाचे औचित्य साधत इंदापूर शहरात मुस्लिम समाजाच्या वतीने हिंदू बांधवांना दिवाळी फराळाचे वाटप करण्याचा स्तुत्य उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या उपक्रमातून इंदापूर शहरातील हिंदू -मुस्लिम ऐक्याचे आणि सामाजिक सलोख्याचे अभिनव दर्शन घडले.

इंदापूर नगरपालिका मैदान तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक १ व २ येथे हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी मुस्लिम समाजातील बांधवांनी अत्यंत प्रेमाने आणि आपुलकीने हिंदू बांधवांना दिवाळी फराळाचे वाटप करून सामाजिक एकतेचा अनोखा संदेश दिला. संपूर्ण राज्यात आदर्श उपक्रम म्हणून संपन्न झालेल्या

या सामाजिक उपक्रमाला लोकनेते प्रदिप गारटकर यांनी मोलाचे सहकार्य केले. समाजातील सर्व जाती धर्मांच्या नागरिकांनी एकमेकांच्या सुख-दुःखात सहभागी व्हावे, सण-उत्सव एकत्र साजरे करावेत आणि माणुसकीचे नाते अधिक दृढ व्हावे, या भावनेतून प्रदिप गारटकर यांनी या उपक्रमाला दिलेले सहकार्य विशेष उल्लेखनीय ठरले.

यावेळी मुस्लिम समाजाच्या वतीने लोकनेते प्रदिप  गारटकर यांचा विशेष सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी तशुभाई सय्यद व फरजाना मुजावर यांनी मुस्लिम बांधवांच्या वतीने आपले मनोगत व्यक्त करत त्यांनी सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि सर्वधर्मसमभावाचे महत्त्व अधोरेखित केले.

समाजकारण करताना माणसाची जात, धर्म किंवा पंथ पाहण्यापेक्षा माणसातील माणुसकी पाहणे महत्त्वाचे असते. माणसांना जोडणारी नाती ही कोणत्याही धर्मापेक्षा मोठी असतात, हीच भावना प्रदिप गारटकर यांच्या या सहकार्यातून अधोरेखित झाली.

माणसांच्या मनामध्ये प्रेमाचा दिवा पेटवता आला तर त्यापेक्षा मोठी दिवाळी कोणतीच नाही. धर्माच्या भिंती उभ्या करण्यापेक्षा माणुसकीचे पूल बांधण्यातच खरे समाजकारण आहे. एकमेकांच्या सणात सहभागी होणारी आणि एकमेकांच्या आनंदात आनंद मानणारी माणसेच खऱ्या अर्थाने समाज समृद्ध करतात." प्रदिप गारटकर यांची ही सर्वधर्मसमभावाची आणि माणुसकीला प्राधान्य देणारी भूमिका इंदापूरच्या सामाजिक जीवनासाठी निश्चितच प्रेरणादायी आहे.

आजच्या काळात समाजात धार्मिक सलोखा, परस्पर विश्वास आणि बंधुभाव टिकवून ठेवण्याची नितांत गरज आहे. अशा परिस्थितीत मुस्लिम बांधवांनी हिंदू बांधवांना दिवाळी फराळ वाटप करून दिलेला प्रेमाचा संदेश आणि या उपक्रमाला प्रदिप  गारटकर यांनी दिलेले सहकार्य ही निश्चितच कौतुकास्पद बाब आहे.

इंदापूर शहराला सामाजिक ऐक्य, सर्वधर्मसमभाव आणि बंधुभावाची समृद्ध परंपरा लाभली आहे. या उपक्रमाने या परंपरेला आणखी उजाळा दिला असून, सण-उत्सव हे केवळ धार्मिक परंपरा जपण्याचे नव्हे तर माणसामाणसां मधील नाती अधिक घट्ट करण्याचे माध्यम आहेत, हे पुन्हा एकदा सिद्ध केले.

धर्म वेगवेगळे असू शकतात, सण वेगवेगळे असू शकतात; पण माणुसकी, प्रेम आणि आपुलकी यांची भाषा मात्र एकच असते!

धर्म कोणताही असो, माणुसकी हाच खरा धर्म आणि माणसे जोडणे हेच खरे समाजकारण असल्याचा संदेश यानिमित्त देण्यात आला.

यानिमित्त आशा के रंग हा गाण्यांचा कार्यक्रम संपन्न झाला. यामधील यारी है ईमान मेरा यार है ये जिंदगी या गाण्यावर प्रदीप गारटकर यांच्या सह उपस्थित मान्यवरांनी नृत्य करत कार्यक्रमाचा आनंद व्दिगुणित केला. यावेळी माजी आमदार यशवंत माने,  जिल्हा परिषदेचे माजी आरोग्य व बांधकाम सभापती प्रवीण माने, विरोधी पक्षनेते अनिल पवार, तय्यब शेख, गफूर सय्यद, शब्बीर बेपारी, वासिम बागवान, संजय शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा