टाइम्स 45 न्युज मराठी
मो.-9730 867 448
जांभुड ता.माळशिरस जि. सोलापूर येथे विश्व साहित्यरत्न लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे यांची १०३ वी जयंती कर्तव्यंदक्ष प्रतिष्ठान च्या वतीने साजरी करण्यात आली .
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सहकारमहर्षी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन .प्रकाशराव पाटील हे होते.
सदर कार्यक्रमप्रसंगी माळशिरस पंचायत समिती उपसभापती प्रतापराव पाटील, धनाजी साठे जिल्हा सरचिटणीस मानवहित लोकशाही पक्ष .धनाजी शिवपालक उपविभागीय दक्षता व नियंत्रण समिती सदस्य,मल्हारी नाईकनवरे माजी पोलीस पाटील, शिवाजी कचरे, नारायण पाटील,माजी सरपंच शिवाजी पाटील,बबन खटके, मेजर बापू कचरे, ग्रामपंचायत सदस्य शिवाजी केचे, सतीश पवार, हनुमंत बेलदर, दादा माने,राहुल खटके, सचिन चंदनशिवे,हे मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने कर्तव्यदक्ष प्रतिष्ठानच्या वतीने माजी सैनिक,गुणवंत विध्यार्थी, जेष्ठ नागरिक यांचा गौरव व नागरी सत्कार , तसेच शालेय साहित्याचे वाटप हे सामाजिक उपक्रम राबविण्यात आले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनाजी साठे यांनी केले तर प्रदिप नाईकनवरे यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.
हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी कर्तव्यदक्ष प्रतिष्ठान अध्यक्ष राम नाईकनवरे, उपाध्यक्ष गणेश नाईकनवरे, कार्याध्यक्ष सोनू नाईकनवरे, खजिनदार पांडुरंग नाईकनवरे, सचिव नारायण नाईकनवरे, दादा नाईकनवरे, अभिमान नाईकनवरे, रसूल मुलाणी, नितिन नाईकनवरे,रणजीत साठे, हेमंत नाईकनवरे, बिट्टू गायकवाड ,सुदाम नाईकनवरे, सागर नाईकनवरे आण्णा नाईकनवरे, तुकाराम नाईकनवरे,ज्ञानेश्वर नाईकनवरे,आदींनी परिश्रम घेतले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा