अकलूज-प्रतिनिधी केदार लोहकरे
मो.9890 095 283
अकलूज येथील शंकरराव मोहिते महाविद्यालयातील अंतर्गत तक्रार निवारण समिती व कौशल्य विकास समिती यांच्या संयुक्त विद्यमाने नागपंचमी सणाच्या निमित्त मेहंदी स्पर्धा,हेअर स्टाईल स्पर्धा व उपवासाच्या पदार्थांच्या स्पर्धेचे आणि पारंपरिक खेळ व गाणी यांचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून महात्मा फुले शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.जयश्री धुमाळ यांनी नागपंचमीची सणाचे महत्त्व सांगून.मुलींनी आपल्या सांसकृती,परंपरा आणि आधुनिकता यांचा समन्वय साधून मार्गक्रमण केले पाहिजे.याप्रसंगी जिजामाता कन्या प्रशालेच्या माजी मुख्याध्यापिका सौ.मंजुश्री जैन यांनी सर्व विद्यार्थिनींना पारंपरिक खेळ व त्यापासून होणारा सर्वांगसुंदर व्यायाम आणि त्यातून घडून येणारा व्यक्तिमत्त्व विकास यांचे महत्त्व सांगितले.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दत्तात्रय बागडे यांनी विद्यार्थिनींना नागपंचमीच्या शुभेच्छा देऊन आपली रूढी परंपरांचे जतन व संवर्धन करणे आवश्यक आहे. असे कार्यक्रमातून पुस्तकी ज्ञानाच्या पलिकडले अनुभव देतात.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.अश्विनी हेगडे,आभार प्रदर्शन प्रा.पद्मा रहाटे,सुत्रसंचलन डॉ. सविता सातपुते यांनी तर स्पर्धा नियमावली वाचन प्रा.स्मिता पाटील यांनी केले
तीन स्पर्धा प्रकारात एकूण ४७ स्पर्धकांनी सहभाग घेतला.या स्पर्धेचे परीक्षक म्हणून डॉ.सौ. जयश्री धुमाळ,सौ.मंजुश्री जैन यांच्या बरोबर प्रा.सुलोचना देशमुख,प्रा.विजया बागल, प्रा.पद्मा रहाटे यांनी काम पाहिले
या कार्यक्रमाला महाविद्यालय विकास समिती सदस्य डॉ.अपर्णा कुचेकर,एन सी सी कमांडर नंदकुमार गायकवाड,कार्यालयीन अधीक्षक युवराज मालुसरे,स्वाती मिरासदार आवर्जून उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व ज्युनिअर,सिनीअरच्या सर्व प्राध्यापिका तसेच उदय जाधव व काळे या सर्वांचे सहकार्य लाभले. सर्व विद्यार्थिंनींनी पारंपरिक खेळ व गाण्यांचा मनमुराद आनंद लुटला.
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे *मेहंदी स्पर्धा-श्रुती तानाजी पवार (प्रथम),नाझिया मौलाना शेख (द्वितीय),वैष्णवी विजयकुमार भोसले (तृतीय),नेहा तानाजी पवार (उत्तेजनार्थ)
*हेअर स्टाईल स्पर्धा-नेहा तानाजी पवार(प्रथम),सारा आजाद सय्यद (द्वितीय),श्रुती तानाजी पवार (तृतीय)
*कुकींग स्पर्धा-नेहा तानाजी पवार (प्रथम),श्रुती विठ्ठल चव्हाण (द्वितीय),गौरी नानासो वसेकर ( तृतीय)
सर्व यशस्वी विद्यार्थिनींना महाविद्यालयाच्या वतीने प्रमाणपत्रे व बक्षिसे देण्यात आली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा