टाइम्स 45 न्यूज मराठी नेटवर्क
स्वातंत्र्य दिनानिमित्त 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य सैनिकांचे वारस म्हणून अकलूज नगरपरिषदेचे मुखयाधिकारी दयानंद गोरे यांनी सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटी असंघटीत कामगार संघटनेच्या अध्यक्ष "ज्योतीताई कुंभार "यांचा सन्मान केला त्या सन्मानाच्या अनुषंगाने ज्योतीताई कुंभार यांनी व्यक्त केलेला "जीवन प्रवास " पुढील प्रमाणे
स्वातंत्र्य सैनिक -सदाशिव रामचंद्र कुंभार हे माझे सासरे असून रामचंद्र सावळा कुंभार हे माझे वडील आहेत या दोघांचा मला सार्थ अभिमान वाटतो मला माझ्या सासऱ्यांनी आणि वडिलांनी कधीच कुठल्या कामाची अडचण येऊ दिली नाही या दोघांमुळे माझ्या रक्तात समाजसेवेचा वारसा आहे शिवाय आज मला अभिमानाने सांगावेसे वाटते की माझ्या पाठीशी कै. प्रतापसिंह शंकरराव मोहिते पाटील ,पद्मजादेवी प्रतापसिंह मोहिते पाटील, सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष- धवल सिंह प्रतापसिंह मोहिते पाटील, उर्वशीराजे धवलसिंह मोहिते, पाटील ,यांच्यासारख्या मोठ्या मनाची माणसे यांच्या मार्गदर्शनाखाली समाज कार्य करण्याची संधी प्राप्त झाली आणि मी शून्यातून विश्वानिर्माण केले आशिया खंडातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या अकलूज ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये उमेदवारी ची संधी प्राप्त करून दिली आणि मी निवडून आले निवडून आणण्यात डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांचा सिंहाचा वाटा होता त्यांच्या सहकार्यामुळे मी शून्यातून विश्व निर्माण केले मला जे काही यश प्राप्त होते ते मी कै.प्रतापसिंह मोहिते पाटील यांना अर्पित करते
निमसाखर ता. इंदापूर या गावातील एका छोट्याशा कुटुंबातील मुलगी असून मला चार बहिणी एक भाऊ दोन चुलते त्यांची मुले आहेत माझ्या कुटुंबात मी माझे पती एक मुलगा एक मुलगी असा परिवार असून माझे वडील स्वातंत्र्यसैनिक असल्यामुळे मला त्यांचा फार अभिमान वाटतो मी जे काही आहे तेही त्यांच्यामुळे ही आहे आणि मला जो काही आजपर्यंतचा मान सन्मान मिळाला आणि मिळत आहे तो डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील यांच्यामुळेच..,,..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा