अकलूज ------प्रतिनिधी
केदार -----लोहकरे
टाइम्स 45 न्यूज मराठी
मो.-9890 095 283
शंकरराव मोहिते महाविद्यालय अकलूज व जिल्हा क्रीडा कार्यालय सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने खशाबा जाधव इंडोवर स्टेडिम येथे तालुकास्तरीय शालेय बुद्धिबळ क्रीडा स्पर्धा नुकत्याच पार पडल्या.या स्पर्धेचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.दत्तात्रय बागडे व कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक राजकुमार इंगोले यांच्या शुभहस्ते करण्यात आले.यावेळी व्यासपीठावर निमगाव विद्यामंदिर निमगाव या शाळेचे क्रीडा शिक्षक ठवरे,माळीनगरचे रितेश पांढरे व सर्व क्रीडा शिक्षक,बुद्धिबळ पंच, महाविद्यालयाचे प्रा.अरविंद वाघमोडे,प्रा.दादासाहेब कोकाटे व कार्यालयीन अधीक्षक युवराज मालुसरे तसेच या स्पर्धेसाठी पंच म्हणून लाभलेले आठवले सर,अली सर,बोराटे सर व कनिष्ठ महाविद्यालयाचे क्रीडा शिक्षक बाळासाहेब भोसले हे उपस्थित होते
या स्पर्धेमध्ये १४,१७ व १९ वयोगटांमध्ये एकूण २२७ खेळाडूंनी सहभाग घेतला.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दादासाहेब कोकाटे सर यांनी केले.यावेळी माळशिरस तालुक्यातील क्रीडा शिक्षक व पालक वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता.
या स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे *१४ वर्षे मुले गट -चि.श्रावण किशोर बोराटे (प्रथम),शौरतेेज संग्रामसिंह भागे (द्वितीय),संजय रुपनर (तृतीय),ओम श्रीकृष्ण पाटील (चतुर्थ ),सोहम नानासो कर्चे (पाचवा)
*१७ वर्षे वयोगट मुले -पार्थ महावीर पाटील (प्रथम),यशराज अरविंद कोरटकर (द्वितीय), आदिनाथ गणेश हावले (तृतीय),साईश्री अशोककुमार पोतखुले(चतुर्थ),हर्षवर्धन भाऊसाहेब काळे (पाचवा )
*१९ वर्षे गट मुले -प्रणव अरुण बोरकर(प्रथम),शिवराज संजय सालगुडे (द्वितीय),तनवीर अंश तांबोळी (तृतीय),ओम अंकुश तुबल (चतुर्थ),पार्थ कालिदास सावंत (पंचम)
*१४ वर्ष मुली - कु.रक्षिता रमेश जाधव (प्रथम),श्रेया आप्पासाहेब पवार (द्वितीय),अनन्या अनिल पाटील (तृतीय),अनुष्का महारुद्र कुळी (चतुर्थ),प्रियंका अनिल पाटील (पंचम )
*१७ वर्षे गट मुली -कु.सारिका अभिजीत बावळे (प्रथम),कु. श्रुतिका सुधीर पवार (द्वितीय), कु.तेजश्री किसन चव्हाण (तृतीय),कु.समृद्धी राहुल बिडकर (चतुर्थ ),कु.स्नेहा अनिल पाटील (पंचम)
*१९ वर्षे गट मुली -कु.गौरी विष्णु देवमाने देशमुख (प्रथम),कु.प्रिया अंकुश खुळे (द्वितीय),रिया रवींद्र भंडारे (तृतीय)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा