संपादक ----हुसेन मुलाणी
टाइम्स- 45 -न्यूज मराठी
मो.--9730 867 448
तुळजापूर तालुक्यातील मौजे तामलवाडी येथे अनेक कंपन्या किंवा मिनी औद्योगिक वसाहत असून सदरील कंपन्या मधील काही कंपन्या आंतरराष्ट्रीय व काहीं राष्ट्रीय दर्जाच्या कंपन्यांनी ग्रामपंचायत तामलवाडीचे महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग मंत्रालय यांनी निश्चित केलेल्या कर रकमेतून अंदाजे प्रत्येक वर्षाकाठी एक कोटी ते सव्वा कोटी रुपये बुडवत असल्याचे निदर्शनास येत असून या मिळणाऱ्या कररूपी उत्पन्नातून/स्वनिधी मधून गावातील संपूर्ण मूलभूत सुविधा जसे सिमेंट रस्ते, वीज, पिण्याचे पाणी, वापरण्याचे पाणी, गरम पाण्याची व्यवस्था, कर्मचाऱ्यांचे पगार, प्रत्येक समाजासाठी स्मशानभूमी, गरीब विद्यार्थ्यांसाठी डिजिटल शाळेकरता लागणारे साहित्य, विद्यार्थ्यांसाठी खेळाचे मैदान व साहित्य अशा खूप चांगल्या प्रकारच्या सर्व सुविधा सर्वसामान्य गावकऱ्यांसाठी किंवा जनतेसाठी तसेच सर्व सुविधा चे दुरुस्ती देखभाल पैशाची व्यवस्था चांगल्या पद्धतीने होऊ शकेल जेणेकरून कोणत्याही आमदार व खासदारावर गाव अवलंबून राहणार नाही जे कर मिळाला हवेत ते पैसे मागील कित्येक वर्षापासून काही राजकीय व्यक्तींच्या व्यक्तिगत स्वार्थापोटी ग्रामपंचायत कार्यालयात जमा न करता व्यक्तिगत रित्या कंपन्याद्वारा उपभोग घेऊन ग्रामपंचायत कर चुकवेगिरी करण्याकरता काहीं लोकप्रतिनिधी व प्रतिष्ठित नागरिकद्वारे लोकशाहीचा गैरवापर करून उद्योजकांना मदत केली जाते याची चर्चा गावकऱ्यात होत आहे हे लक्षात येताच सत्य गावकऱ्यांना समजण्याकरिता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधानसभा प्रभारी अध्यक्ष शिवाजी रामकृष्ण सावंत (माजी सैनिक) यांनी पुढील अभिलेखाच्या नक्कल माहिती अधिकार २००५ अंतर्गत ग्रामपंचायत तामलवाडीस मागणी केल्या आहेत ज्यामुळे ग्रामपंचायत तामलवाडी चे वार्षिक उत्पन्नाचे आकलन केले जाऊ शकते त्याप्रमाणे वार्षिक आराखड्यात आवश्यकतेनुसार तरतुदी केल्या जाऊ शकतात व गावचा विकास अधिक वेगाने केला जाऊ शकतो:-
१) मौजे तामलवाडी येथील ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात किती उद्योगधंदे, प्रायव्हेट लिमिटेड तसेच लिमिटेड कंपनी आहेत.
२). मौजे तामलवाडी ग्रामपंचायतकडे ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांनी सादर केलेले *कन्स्ट्रक्शन प्लॅन, बांधकाम ब्लू प्रिंट, कारखाना नकाशा, ७/१२ उतारा, ८ 'अ', बांधकाम परवाना, कंपनीस कोणत्या प्रोडक्शन करता परवाना दिला आहे त्या परवान्याची नक्कल, कंपन्यांनी भरलेल्या कराच्या मागील तीन वर्षाच्या पावत्या, त्या संदर्भातील ग्रामपंचायत प्रोसिडिंग नक्कल.
३). जर वरील कागदपत्राची पूर्तता २३ ऑगस्ट २०२३ पर्यंत नाही झाल्यास किंव्हा नाही दिल्यास २४ ऑगस्ट २०२३ रोजी ग्रामपंचायत कार्यालय तामलवाडी समोर सकाळी १०:०० वाजता लाक्षणीक उपोषण करणार असल्याचे लेखी स्वरूपात निवेदन जिल्हाधिकारी उस्मानाबाद, मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद उस्मानाबाद, तहसीलदार तहसील कार्यालय तुळजापूर, गटविकास अधिकारी पंचायत समिती तुळजापूर, ग्रामपंचायत कार्यालय तामलवाडी, पोलीस स्टेशन तामलवाडी यांना श्री सावंत यांनी दिलेली आहे तसेच आमच्या प्रतिनिधीस कळवले आहे याकडे संपूर्ण पंचक्रोशीचे या लक्ष लागले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा