अकलूज ------प्रतिनिधी
लक्ष्मीकांत ----कुरुडकर
मो. 7020 664 407
श्रावण महिना म्हणजे सणांचा राजा आणि याच श्रावण महिन्याचा पहिला सण म्हणजे नागपंचमी. शेतकऱ्याचा मित्र असलेल्या नागाची पूजा करत त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण साजरा केला जातो.
वसंत ऋतुच्या आगमनाने नागपंचमीच्या शुभदिनी सर्वांना सुख समृद्धी मिळो हा शुभेच्छा संदेश देत आणि हर हर महादेव चा जयघोष करत शिवरत्न सेमी इंग्लिश स्कूलमध्ये नागपंचमी सणानिमित्त विविध क्रीडा प्रकारांचे आयोजन करण्यात आले होते.
मुलांसाठी पतंग उडवणे, रनिंग रेस, स्लो सायकलिंग आणि मुलींसाठी मेहंदी आणि दोरी उड्या या स्पर्धा घेण्यात आल्या. मुलांच्या या स्पर्धा नंतर पुरुष शिक्षकांसाठी स्लो सायकलिंग तर महिला शिक्षकांसाठी संगीत खुर्चीचे आयोजन करण्यात आले होते.
अशा या अस्सल ग्रामीण आणि मराठमोळ्या सणानिमित्त विद्यार्थ्यांसोबत शिक्षकांनी देखील नागपंचमीची गाणी म्हणत, फेर धरत नागपंचमीचा सण अतिशय पारंपारिक पद्धतीने उत्साहाच्या वातावरणात साजरा केला.
नागोबाचे रक्षण करू, हीच खरी नागपंचमी, श्रावणातील या पहिल्या सणाच्या हार्दिक शुभेच्छा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा