उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या समय सूचकते मुळे भारतीय सैन्य दलात असलेल्या जवानाला घेता आले आपल्या आईचे " अंत्यदर्शन"
संपादक----हुसेन मुलाणी
टाइम्स 45 न्युज मराठी
मो.-9730 867 448
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दाखवलेल्या समयसूचकतेमुळे ३४०० किलोमीटर अंतर २८ तासांत पार करत मुर्टी-मोढवे (ता. बारामती) येथील आपल्या जन्मदात्या आईचे अंत्यदर्शन घेता आले.
भारत-चीन सीमेवर तैनात असलेल्या एका जवानाला देशाचे संरक्षण मंत्रालय व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दाखवलेल्या समयसूचकतेमुळे ३४०० किलोमीटर अंतर २८ तासांत पार करत मुर्टी-मोढवे (ता. बारामती) येथील आपल्या जन्मदात्या आईचे अंत्यदर्शन घेता आले.
मुर्टी-मोढवे येथील शालन आनंद ठोंबरे (वय ६०) यांचे सोमवारी (ता. २१) सकाळी ११ वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. यावेळी त्यांचा मुलगा विजय आनंदा ठोंबरे हा लेह लडाखपासून पुढे ४०० किलोमीटर अंतरावर भारत-चीन सीमेवर समुद्रसपाटीपासून १६५०० फूट उंचीवर बंदोबस्त करत होते. त्यांचे केडगाव येथील नातेवाईक व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष दत्तात्रेय हंडाळ यांनी त्यांच्याशी फोनवरून संपर्क करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांचा फोन लागत नव्हता. त्यानंतर हंडाळ यांनी अजित पवार यांचे स्वीय सहायक हनुमंत पाटील यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी तो फोन थेट अजित पवार यांच्याकडे दिला. त्यांनी परिस्थिती समजून घेतली. त्यानंतर त्यांनी स्वतःच्या फोनवरून सूत्रे हलवण्यास सुरवात केली.
त्या रात्री ठोंबरे यांचा मृतदेह एका खासगी दवाखान्यात ठेवण्यात आला होता. इकडे अजित पवार यांनी संरक्षण मंत्रालयाचे विविध अधिकारी, शरद पवार यांचे स्वीय सहायक सिद्धेश्वर शिंपी व अधिकारी उदय कोठावर यांच्यामार्फत संरक्षण मंत्रालयातील सूत्रे हलवली. त्यानंतर फौजी ठोंबरे यांचा दुपारी ४ वाजता शासकीय गाडीमध्ये भारत-चीन सीमेवरून प्रवास सुरू झाला. रात्री ७.३० वाजता १२५ किलमोटीर अंतर कापत ठोंबरे हे बुरसे येथे पोचले. काही वेळ विश्रांती घेत रात्री १० वाजता एका शासकीय अधिकाऱ्यासोबत त्यांनी लेहकडे प्रयाण केले. या परिसरात रात्रीच्या प्रवासास बंदी असूनही विशेष गरज म्हणून संरक्षण विभागाने वरील मोहीम राबवली.
ठोंबरे यांनी २७० किलोमीटर अंतर शासकीय वाहनातून अडथळ्याची शर्यत पार करत मंगळवारी (ता. २२) सकाळी ६.३० वाजता ते लेहमध्ये दाखल झाले. त्यानंतर सकाळी ७.४० वाजता प्रायव्हेट जेटमध्ये ठोंबरे बसले व पाऊण तासाच्या फरकाने सकाळी ८.४५ वाजता दिल्ली विमानतळावर पोहोचले. विश्रांतीनंतर १०.५० वाजताच्या विमानाने ते दुपारी १.१० वाजता पुणे विमानतळावर आले. नातेवाईक दत्ता हंडाळ यांनी स्वतःच्या चार चाकी वाहनामध्ये त्यांना घेतले व ३.३० वाजता मुर्टी मोढवे येथे आणले. त्यांनी आपल्या आईचे अंत्यदर्शन घेतले. यावेळी उपस्थितांच्या भावना अनावर झाल्या. त्यानंतर दुपारी ४ वाजता अंत्यविधी झाला.
संरक्षण मंत्रालय व अजित पवार यांच्या मदतीमुळेच मला माझ्या आईच्या अंत्यदर्शन घेता आले. माझ्या आयुष्यातील हा दुःखद क्षण असला, तरी निश्चितच अविस्मरणीय आहे. मी सर्वांचे आभार व्यक्त करतो.
- विजय ठोंबरे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा