मैत्री प्रतिष्ठान च्या वतीने दिनांक 1 सप्टेंबर 2023 रोजी "रास्ता रोको" आंदोलन
संपादक----हुसेन मुलाणी
टाइम्स 45 न्युज मराठी
मो.-9730 867 448
अकलूज येथील गिरझणी चौक (महाराणा प्रताप चौक) येथे गतिरोधक नसल्यामुळे वारंवार अपघात होत आहेत त्यामुळे या चौकात गतिरोधक बसवावे अशी मागणी मैत्री प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य ,अकलूज च्या वतीने 23 ऑगस्ट 2023 रोजी अकलूज येथील सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदनाद्वारे केली होती, वारंवार विनंती करून, निवेदन देऊनही बांधकाम विभागाने अद्याप कोणतेही कारवाई न केल्याने आणि झोपेचे सोंग घेतलेल्या बांधकाम खात्याच्या विरोधात अखेर मैत्री प्रतिष्ठान अकलूज व माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 1 सप्टेंबर 2023 रोजी अकलूज येथील महाराणा प्रताप चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती मैञी प्रतिष्ठानचे महाराष्ट्र राज्य चे अध्यक्ष महेश शिंदे यांनी दिली
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा