Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, ३१ ऑगस्ट, २०२३

ALERT NEWS

 अकलूज नगरपरिषदेचे "दफन भूमी "कडे दुर्लक्ष सर्वत्र अंधाराचे साम्राज्य --मुस्लिम समाजात नाराजी.


संपादक----हुसेन मुलाणी

टाइम्स 45 न्युज मराठी

मो.-9730 867 448

                  अकलूज येथील नगरपरिषदेच्या हद्दीतील माळीनगर रोड वरील मुस्लिम दफनभूमी मध्ये प्रकाशासाठी दोन हायमास्ट चे खांब खासदार, --विजयसिंह मोहिते पाटील व आमदार- रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या निधीतून लावले असून त्या दोन्ही खांबावरील हाय मस्त दिवे बंद असल्याने नगरपरिषदेचा भोंगळ कारभार दिसून येत आहे शिवाय दफनभूमीत सर्वत्र अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले आहे त्यामुळे रात्री अपरात्री मुस्लिम समाजातील एखाद्या व्यक्ती मयत झाली आणि त्याच्या दफन विधीसाठी मृतदेह दफनभूमीचा आणला तर सर्वत्र अंधाराचे साम्राज्य दिसून येत आहे त्यामुळे मयत दफन करताना विविध प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागते

 शिवाय या दफनभूमीत झाडे झुडपे असल्याने सरपटणारे प्राण्यांचा वावर होत असतो याचा कदाचित नजर चुकीने त्या सरपटणाऱ्या प्राण्यांवर पाय पडला आणि त्याने एखाद्या व्यक्तीस दंश केला तर त्याला जबाबदार कोण? त्यामुळे अकलूज नगर परिषदेच्या बेजबाबदारपणामुळे असे अनर्थ घडण्याची शक्यता नाकारता येत नाही तरी अकलूज नगर परिषदेने दफनभूमीतील हायमास्ट लॅम्प चालू करावे असे मुस्लिम समाजातून मागणी होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा