Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, १९ ऑगस्ट, २०२३

सराटी ता. तुळजापूर येथे शिवसेना( उद्धव बाळासाहेब ठाकरे )शाखेचे नूतनीकरण

 

        

 संपादक--- हुसेन मुलानी

टाइम्स 45 न्यूज मराठी

 मो.-9730 867 448

                  सराटी तालुका तुळजापूर येथे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शिवसेना शाखेचे नूतनीकरण करण्यात आले

याप्रसंगी नवनियुक्त पदाधिकारी तसेच सर्व शिवसैनिकांना व नूतन पक्षप्रवेश केलेल्या नेत्यांना शुभेच्छा देत एकजुटीने काम करून तालुक्यातील शिवसेना मजबूत करण्याचे आवाहन केले. 

याच बरोबर यावेळी समर्थ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा यथोचित सत्कार करून त्यांना मनःपूर्वक खूप खूप शुभेच्छा दिल्या.

यावेळी बोलताना आपल्या भागातील गावातील ग्रामस्थांच्या अडचणी , शेतकऱ्यांच्या समस्या विद्यार्थांच्या समस्या असतील या सर्व समस्या आपल्या गावातील शाखाप्रमुख शिवसैनिक यांच्या माध्यमातून आमच्या पर्यंत पोहाचवाव्यात त्या सोडवण्याचा नक्कीच प्रयत्न करू असा विश्वास सहसंपर्कप्रमुख नंदुभैय्या राजेनिंबाळकर यांनी व्यक्त केला.

याप्रसंगी सहसंपर्कप्रमुख नंदुभैय्या राजेंनिंबाळकर, युवासेना तालुकाप्रमुख प्रतीक रोचकरी, माजी नगरसेवक प्रदीप घोणे, माजी उपजिल्हाप्रमुख कमलाकर काका चव्हाण, बाबुराव महाबोले, काशिनाथ वहंद्रे, गहिनीनाथ हिंगमिरे, अमोल मुळे, समर्थ पाटील, गिरीश बिराजदार, सचिन बिराजदार, वैभव इंगळे, सचिन पाटील, प्रदीप इंगळे, मकरंद पाटील, संजय पवार आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा