गणेशगाव---- प्रतिनिधी
नुरजहाँ---शेख
महाळुंगच्या अस्मिता लोकसंचलित साधन केंद्र अंतर्गत गणेशगांव येथील जनकल्याण ग्रामसंघाची प्रथम वार्षिक सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.
या कार्यक्रमाची सुरुवात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून दिप प्रज्वलन करून करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे सरपंच पोपट रुपनवर,विठ्ठल नलवडे माजी सरपंच शोभा नलवडे उपसरपंच बाळासाहेब ठोकळे,ग्रामपंचायत सदस्य मंगल मदने,सदाशिव शेंडगे,ग्रामसंघ अध्यक्ष वर्षा ठोकळे,सचिव साधना डावरे,खजिनदार संगीता जाधव क्षेत्र समन्व्यक मनीषा जाधव लेखापाल अमोल भोसले फिनिक्स इंग्लिश स्कूलच्या संचालिका नुरजहाँ शेख उपस्थित होते.
यावेळी नागपंचमीचे औचित्य साधून महिलांसाठी विविध पारंपारिक खेळा बरोबर लांबलचक उखाणे एका पाठोपाठ एक घेऊन आणि पंचमीची बहारदार गाणी गाऊन महिला बचत गटातील महिला वर्गांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली
या प्रसंगी मनीषा जाधव यांनी अर्धलीन शेळीपालन व वेगवेगळ्या योजनानविषयी महिलांना मार्गदर्शन केले.तर आपले मनोगत व्यक्त केले.यावेळी मार्गदर्शन करताना नूरजहाँ शेख म्हणाल्या की,महिला सक्षम व्हाव्यात म्हणून शासनाने अनेक योजना महिलांच्या साठी राबविल्या आहेत पण त्या योजनांचा लाभ अल्पशा महिला घेतात.प्रत्येक महिलेने या योजनांचा फायदा उचलण्यासाठी प्रयत्नशील रहावे. यावेळी बचत गटातील महिलांसाठी आवश्यक ती मदत व सहकार्य करण्याचे आश्वासन विठ्ठल नलवडे व सरपंच पोपट रुपनवर यांनी दिले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक वर्षा ठोकळे यांनी केले. सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन मनिषा जाधव यांनी मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा