Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, १९ ऑगस्ट, २०२३

सामना -एक ज्वलंत विचारआहे ! शिवसैनिकांच्या धगधगत्या विचाराचे ते कणखर अस्ञ आहे --अतुल श्रावण भवर ,सोलापूर


 टाइम्स 45 न्युज मराठी

                आम्ही सामना वाचत नाही असे म्हणणारी भाजपची पिलावळ आजचा सामना वाचून रस्त्यावर उतरली आहे.सामना पेपरची होळी करून ते निषेध नोंदवित आहेत.का तर देवेंद्र फडणवीसला सामना वृत्तपत्रात टीका केली म्हणून अरे भाजपच्या बुद्धीहीन भक्तांनो तुम्हा लोकांना जर टीका सहन होत नसेल तर तुमचे बापजादे जे आहेत राणेफीणे,बावनकुळे,राम कदम,शेलार यांसारख्या फालतू लोकांना जरा त्यांच तोंड आवरायला सांगा तुम्ही साल्यांनो इतरांचे बाप काढणार आणि सामनाने तुमचे बाप काढले तर तुमच्या ढूंगणाला मिर्च्या झोंबतात का ? सामना एक ज्वलंत विचार आहे शिवसैनिकांच्या धगधगत्या विचारांच ते अस्त्र आहे.सामना वृत्तपत्र जाळून काय झाट फरक पडत नाही तुमच्या रीकाम्या डोक्यात ठाकरें विषयी जी मळमळ आहे त्या मळमळीला अगोदर आग लावा.

सत्य पचवायला ताकद लागते ती ताकद भाजपमधे नाही.इतर पक्षातील आमदार खासदारावर इडी लावण्या इतपतच भाजपमधे ताकद आहे परंतू निवडणुका लावायची धमक आणि दम भाजपमधे नाही.भाजप हा जळक्या वृत्तीचा पक्ष आहे.आज ज्या लोकांना भाजपने जवळ घेतले आहे त्या लोकांच्या पाठीत सुरा खुपसायला भाजपने सुरूवात केली आहे.उद्धवसाहेबांच्या पाठीत खंजीर खुपसणारी भाजपा मिंधेला आणि अजित पवारच्या पाठीत एक दिवस खंजीर खुपसणार आहे हा पक्ष कधीच कोणाचा होऊ शकत नाही हा इतिहास आहे जरा इतिहासाची पानं चाळून बघा..


भाजपमधे कोणीही नागड नाचा त्याच्यावर कारवाई होणार नाही भाजपच्या नेत्यांवर महिलांवर आत्याचाराचे गुन्हे आहेत तो युपीचा बृजभुषणसिंह त्याच्यावर काही खेळाडू महिलांनी आरोप केले पण पैशापुढे आणि सत्तेपुढे तो नालायक सही सलामत सुटला.महाराष्ट्रातील एक गटारीतला किडा किरीट सोमय्या त्यानेही अनेक महिलींना विवस्त्र केले तो स्वत: नागडा झाला तरीही भाजप त्याला y दर्जाची सिक्युरीटी देते जणू तो भाजपचा जावई आहे अशी त्याला सुरक्षा दिली जाते.तुमची ही नासकी धंदी जनतेला चांगलीच माहित आहेत फक्त निवडणूकीची वाट जनता पाहत आहे

सामनाचे संपादक संजयजी राऊत साहेब योग्यच लिहितात ते रोखठोक बोलतात म्हणूनच भाजपची तळपायाची आग मस्तकात जाते.भाजपची ही हलकी मस्तके फक्त सामना जाळू शकतात परंतू जनतेच्या मनातील भाजपा विरोधात जो उद्रेक आहे तो शांत करू शकत नाहीत.सामना न वाचणारे आज सामना खरेदी करून त्याच्या विरोधात आंदोलन करतात हीच खरी सामनाची दहशत आहे हाच खरा सामनाचा विजय आहे.


*जय महाराष्ट्र.*

*अतुल श्रावण भवर,सोलापूर.*

*मो नं 9960090001.*

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा