अकलुज -----प्रतिनिधी
केदार ---लोहकरे
टाइम्स 45 न्युज मराठी
मो. 9890 095 283
हिंदू संस्कृतीमध्ये भाऊ व बहिणीचा अतूट नाते असलेला सण म्हणजे रक्षाबंधन ! या सणाचे महत्व लहान वयातच मुलांना समजण्यासाठी व आपल्या भारतीय संस्कृतीची ओळख व्हावी व जतन व्हावी या उद्देशाने या शाळेमध्ये नेहमीच सण समारंभ साजरे केले जातात यातून मुलांना आपल्या संस्कृतीची जपवणूक करण्याची ओढ निर्माण होते.
माळशिरस तालुक्यातील लवंग (२५/४) येथील फिनिक्स इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी आज रक्षाबंधन सण मोठ्या उत्साहात साजरा केला.या स्कूलमधील चिमुकल्या मुलींनी मुलांना हातात राखी बांधून औक्षण करून मुलांना गोड पदार्थ खायला देऊन हा सण आनंदात साजरा केला.आणि मग सर्वच छोट्या मोठ्या बंधूनी बहिणींना छोटे छोटे गिफ्ट देऊन बहीण भावाच्या सुरेख नात्याचे दर्शन घडविले.त्यामुळे मुलांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद अनुभवायला मिळला.
यावेळी मार्गदर्शन करताना नूरजहाँ शेख म्हणाल्या की,आजकाल पाश्चात्य संस्कृतीच्या आक्रमणामुळे आपल्या देशाची संस्कृती ऱ्हास होत चालली असल्यामुळे आपली सांस्कृतीचा वारसा पुढे चालू ठेवण्यासाठी लहान वयातच बालमनात आपल्या सण समारंभाचे महत्त्व समजण्यासाठी आपसात बंधुभाव निर्माण होण्यासाठी विविधतेतुन एकता हि आपली संस्कृती जोपासली पाहिजे .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा