Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, २९ ऑगस्ट, २०२३

सोलापूर लोकसभा मतदारसंघात आर पी आय व भा,ज.पा. एकनाथ शिंदे -गट, युतीमधून "राजाभाऊ सरवदे" यांनाच उमेदवारी

 


श्रीपूर----- जेष्ठ पत्रकार
  बी.टी. शिवशरण
टाइम्स 45 न्युज मराठी
 मो.9579 177 671
                              येत्या लोकसभा निवडणुकीत आरपीआयला लोकसभेच्या दोन जागा सोडण्याची मागणी आरपीआय आहे गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी वारंवार भाजपचे वरिष्ठ सुत्रांकडे केली आहे शिर्डी व सोलापूर हे दोन लोकसभा मतदारसंघ आरपीआयचे बालेकिल्ले म्हणून ओळखले जातात त्या दृष्टीने आरपीआयची तेथे ताकद आहे युतीतुन सदर जागेवर दोन जागा सोडल्या जाव्यात अशी आग्रही मागणी नागरिकांकडून हे शिर्डी लोकसभा मतदारसंघात स्वतः रामदास आठवले युतीतून
 लढण्यास इच्छुक आहेत तसेच आरपीआयचे प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे हे सोलापूर मतदारसंघात निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत या दोन जागेवर आरपीआयचे हे दिग्गज नेते निश्चित मोठ्या बहुमताने विजयी होऊ शकतात सोलापूर लोकसभा मतदारसंघात कोणत्याही परिस्थितीत पक्षाने अधिकृत उमेदवारी दिली तरीही लोकसभा निवडणुकीत उभे रहाणारच अशी घोषणा सोलापूरचे राजाभाऊ सरवदे यांनी केली आहे जर सोलापूरची जागा आरपीआयला सोडण्यात काही गडबड झाली तरी कोणत्याही परिस्थितीत बंडखोरी करण्याची वेळ आली तरी स्वतंत्र लढणारच अशी आरपीआय आठवले गटाचे सोलापूर जिल्ह्यातील वरिष्ठ नेते कार्यकर्ते यांनी सांगितले आहे राजाभाऊ सरवदे यांचे शिवाय सोलापूर लोकसभा निवडणूक सर्वच राजकीय पक्षांना जड जाणार आहे राजाभाऊ सरवदे हे सोलापूर लोकसभा निवडणुकीत किंगमेकर असणार आहेत आरपीआयचे नेत्यांनी म्हटले आहे की जर राजाभाऊ सरवदे यांना उमेदवारी देण्यात कुचराई केली तर भाजप ची एक जागा सोलापूर येथून कमी झाली म्हणून नोंद घ्या त्यामुळे सोलापूर लोकसभा मतदारसंघात सामाजिक राजकीय वातावरण आतापासूनच तापायला सुरुवात झाली आहे विद्यमान खासदार यांनी जातप्रमाणपत्र बोगस सादर केल्याचे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे त्यामुळे भाजपची प्रतिमा तमाम मागासवर्ग बहुजन वर्गात मलिन झाली आहे भाजपने युतीचा राजधर्म पाळून शिर्डी व सोलापूर लोकसभा मतदारसंघ आरपीआय आठवले गटाला सोडण्याची मागणी आरपीआय आठवले गटाच्या माध्यमातून नेत्यांनी कार्यकर्त्यांनी सर्वत्र वातावरण तापवायला सुरुवात केली आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा