इंदापूर तालुका----प्रतिनिधी
एस बी तांबोळी
मोबाईल 8378081147
इंदापुर पोलीस स्टेशन हद्दीत (दि. १९/८/२३) रोजी रात्रगस्त दरम्यान दरोडा घालण्याचे पुर्व तयारीत असलेला टोळीतील इसमांना पकडण्यात यश आले. त्यांना पोलीस कोठडी मध्ये कसून तपास केला असता यातील अटक आरोपी दिलीप सयाजी पवार, (रा. कटफळ रा. बारामती), शामराव उर्फ जगताप काळुराम भोसले, (रा. पिटकेश्वर, ता. इंदापुर), खोपेश्वर उर्फ खोप्या शिवा भोसले, (रा पिटकेश्वर ता. इंदापुर) व शिवा मिठ्ठु भोसले (रा. पिटकेश्वर ता. इंदापुर) (फरार) यांनी मिळून मौजे पिठेवाडी, बावडा, भगतवाडी, निमगाव केतकी, सरस्वतीनगर, भवानीनगर परीसरात चो-या केल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यांच्याकडून सहा तोळे सोने, एक एलईडी टीव्ही अशा ३ लाख १४ हजार रूपयांच्या किंमतीचा मुद्देमाल जप्त करून घरफोडीचे सहा गुन्हे उघड करण्यात आले.
सदरची कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक अंकित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक आनंद भोईट, बारामती विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांचे मार्गदर्शनाखाली तसेच इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार, सहाय्यक पोलीस निरिक्षक नागनाथ पाटील, पोलीस उपनिरिक्षक सुधिर पाडुळे, सहाय्यक पोलीस फौजदार के.बी. शिंदे, पोलीस हवालदार सुनिल बालगुडे, महिला पोलीस हवालदार खंडागळे, माधुरी लडकत, पोलीस नाईक अमोल गायकवाड, सुनिल कदम, जगन्नाथ कळसाईत, पोलीस शिपाई विनोद लोखंडे, आरीफ सय्यद, अकबर शेख, विशाल चौधर, सुधिर शेळके, दिनेश चोरमले यांनी मिळून केली.
---------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा