Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, २३ ऑगस्ट, २०२३

माळशिरस तालुक्यातील गणेश गाव येथील कॅनॉल रस्त्याची दुरावस्था

 


गणेशगाव ------प्रतिनिधी

नुरजहाँ ----शेख

टाइम्स 45 न्युज मराठी

                           माळशिरस तालुक्यातील गणेशगाव येथील सर्व लोकांचा प्रमुख्याने शेती हा व्यवसाय असून अकलूज-टेंभुर्णी या महामार्गाला जोडणा-या गणेशगावचा रस्ता बऱ्यापैकी चांगला आहे.परंतु कॅनॉल पट्टीवरून शेताकडे जाणारा रस्ता अत्यंत धोकादायक असल्यामुळे शेतक-यांना रानातून शेतमालाची ने-आण करणे अतिशय अवघड व धोकादायक झालेला आहे.

             सध्या हा संपुर्ण रस्ता खड्डेमय झाला आहे.आता तर पावसाळ्याचे दिवस चालू असल्यामुळे शेतात दुचाकी वाहन घेऊन जाणे शेतक-यांना शक्य होत नाही.शेतक-यांना शेतातुन आपला शेतमाल घेऊन मुख्य रस्त्याला येणे म्हणजे जीव धोक्यात घालून तारेवरची कसरत करावी लागत आहे.पावसाळ्यात या रस्त्यावरून शेतक-यांना रानात चालत जाणे ही शक्य होत नाही.चिखलमय रस्त्यांमुळे घसरगुंडी झालेली आहे.निसर्ड्या रस्त्यामुळे पाय घसरून पडण्याची किंवा हात पाय मोडण्याची दाट शक्यता असते.


             या भागातील शेतकरी आपल्या शेतात ऊस,केळी यासारखी पिके मोठ्या प्रमाणात घेत आहेत.परंतु खड्डेमय रस्त्यामुळे मोठी वाहने ऊस भरलेली ट्रॅक्टर ट्रॉली किंवा केळीचे लोड भरलेले ट्रक हा चालक आपला जीव धोक्यात घालून आपली कामे करीत आहेत.यापूर्वी अनेकदा ऊसाची ट्रॉली केळीचा ट्रक कॅनॉलमध्ये पडण्याची दुर्घटना घडल्या आहेत.पावसाळ्यात शेतात खते घेऊन जाण्यासाठी कोणी रिक्षावाला किंवा पिकअप तयार होत नाही.या खड्डेमय रस्त्याने जाताना आपल्या वाहनाचे नुकसान होऊन आपले आर्थिक नुकसान होईल या भीतीने कोणी येत नाही.अनेक वर्षापासून ग्रामस्थांनी या कॅनॉल रस्त्याचे खडीकरण किंवा डांबरीकरण व्हावे अशी मागणी करीत आहेत परंतु शेतकऱ्यांच्या या मागणीकडे सत्ताधाऱ्यांचे दुर्लक्ष आहे. मध्यंतरीच्या काळात या रस्त्याला मंजुरी मिळाल्याचे सांगितले जात होते परंतु त्या मंजूरीचे काय झाले हेच ग्रामस्थांना कळाले नही की फक्त रस्त्याचे गाजर दाखवुन शेतकऱ्यांना गप्प केले जात आहे का ? असा प्रश्न ग्रामस्थांकडून सत्ताधाऱ्यांना विचारला जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा