Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, २१ ऑगस्ट, २०२३

डिजिटल आणि आधुनिक युगात पारंपारिक मराठी सणांचे महत्त्व कमी झाले

 

ज्येष्ठ पत्रकार ---श्रीपुर

बी.टी.शिवशरण .

                    हल्ली डिजीटल युगात पारंपरिक मराठी सणांचे महत्व दिवसेंदिवस कमी कमी होत चालले आहे आता फक्त सण आहे म्हणून औपचारिकता बाकी उरली आहे सणांचे दिवशी घरात गोडधोड पुरणपोळी केली जाते तेवढीच काय ती परंपरा आठवण जोपासली जाते आज नागपंचमी सण साजरा होत आहे पण पुर्वी ज्या पध्दतीने नागपंचमी सण साजरा होत होता त्यातील पारंपरिकता खेळ मनोरंजन लोप पावले आहे पुर्वी आषाढी वारी झाली की गावात गल्लीत चौकात स्थानिक महिला तसेच माहेरवाशिणी नागपंचमीच्या सणांची गाणी म्हणत फेर धरून झिम्मा फुगडी काटवट कणा तसेच महिला नवरा बायको चे सोंग करीत महिला च नवरा होत महिला बायको होई त्यातील लटके भांडण त्यातील संवाद मजेशीर पण अर्थपूर्ण व मार्गदर्शक असत नागपंचमी सण आला की सासुरवाशीण मुली माहेरला जाण्यासाठी आतुरतेने भावाची वाट पाहत असे या सणाला आवर्जून नवीन लग्न झालेल्या मुली माहेरला येत या सणानिमित्त गावात प्रत्येक ठिकाणी झाडाला झोके बांधले जात तसेच पुरुष मंडळी आट्यापाट्या खेळत अवघड शिडी तयार केली जायची ती शिडी चढण्यासाठी तरुण पुढाकार घेऊन प्रयत्न करत अजुनही गंमतीचा खेळ म्हणजे मनोरंजन म्हणून दोन वासे काही अंतर ठेवून त्यावर ऊंच रशी बांधून त्यावर पाच ते सात केळी बांधली जायची व खालून सायकलवर बसुन ते केळ तोंडाने तोडण्यासाठी चढाओढ लागायची बक्षीस दहा रुपये ठेवले जायचे महिला तरुणी ठेवणीतील जरीच्या साड्या तसेच मुली रंगीत परकर झंपर घालून नटुन थटुन गावाबाहेर वारुळाला पुजायला घोळक्याने जात प्रत्येकाच्या घरात भिंतीवर नागोबा असलेले रंगीत चित्र त्यावर बृहस्पती पाळण्यात बाळ झोपलेले त्याला आई झोका देत असलेली दोरी घेऊन बसलेली असते आम्ही लहान असताना आमची आई पुरणपोळी करताना एक विशिष्ट प्रकारचा पुरणपोळी चा पदार्थ करुन दोरा हळदी मध्ये रंगवून त्यातील तो दोरा त्या रंगीत नागोबा असलेल्या चित्राला बांधून त्यातील राहिलेला पिवळा दोरा आई आमच्या हातात बांधत असे संध्याकाळी गावात सगळीकडे महिला तरुणी फेर धरून गाणी म्हणत पारंपरिक खेळ खेळत या सणानिमित्त परंपरा पारंपरिक खेळ मनोरंजन व्यायाम या दृष्टिकोनातून पुर्वजांनी काही हेतू ठेवून पारंपरिक कला उत्सव सुरू केले असावेत मात्र हल्ली डिजीटल युगात खेळ कला परंपरा उत्सव आनंद संस्कृती लोप पावली त्यामुळे त्यातील मनमुराद आनंद हरवला झोका चढवणे ऊंच नेणे यासाठी महिलांमध्ये एकच चढाओढ लागायची आता क्वचितच झोका बांधला जातो पण झोका चढवताना हल्लीच्या महिलांना तरुणींना चक्कर येते पुर्वी सण समारंभ कार्यक्रमाला वर्षातुन एकदा नवीन रंगीबेरंगी कपडे घेतले जायचे सणाला गोडधोड व्हायचे पण आता पाहिजे तेव्हा हवे तेव्हा कपडे घेतले जातात स्वीट होम मधुन केव्हाही गोड मिठाई आणली जाते त्यामुळे नवीन कपडे सणाला गोडधोड हा आनंद हरवला आहे सणांचे महत्व आनंद गोडी मोबाईल फोन दुरध्वनी टेलिव्हिजन याच्या अतिवापरामुळे कमी कमी होत आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा