अकलूज ------प्रतिनिधी
शकुर ---तांबोळी
मो.-9860 112 351
सदाशिवराव माने विद्यालयात नागपंचमी निमित्त विद्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . या प्रसंगी अस्वरे मॅडम यांनी नागपंचमी सण साजरा का केला जातो याचे महत्व मुलींना सांगितले .या नंतर वारूळाचे व नागोबा पूजन करून सर्व मुली महिला शिक्षिका यांनी विविध खेळ ,गाणी ,,फेर फुगडी याचा आनंद घेतला .
यावेळी स्नेहा शिंदे मॅडम यांनी पारंपारिक गाणी गायली . या कार्यक्रमा साठी माता पालक संघाच्या सदस्य .सविता गायकवाड , स्वप्नाली कदम , .रुपाली दबडे, . साधना गायकवाड यांनीही मुलीनं बरोबर सहभाग नोंदविला . या मध्ये इयत्ता 5 वी ते 12वी सर्व मुली महिला शिक्षिका यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले होते.यावेळी कार्यक्रमासाठी प्रशालेचे मुख्याध्यापक अमोल फुले सर उपमुख्याध्यापक दत्तात्रय घंटे सर पर्यवेक्षक, शिक्षिका प्रतिनिधी सर्व शिक्षिका व विद्यार्थीनी उपस्थित होत्या . या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्मिता दळवी मॅडम यांनी केले .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा