संपादक------ हुसेन मुलाणी
टाइम्स 45 न्युज मराठी
मो.9730 867 448
आई - वडील मुलांच्या प्रगतीसाठी , शिक्षणासाठी, त्यांच्या "सुखासाठी" , त्यांच्या काळजीत म्हातारे होतात . मुलांना वाटते आई -वडील वयाने म्हातारे झालेत .मुलांचा सांभाळ करता - करता कधी 25 वर्षाचे 60 वय झाले हे कळत देखील नाही . शब्दांची गफलत जो वाचक समजला ,तोच श्रेष्ठ !!
आई -वडील मुलांसाठी कष्ट करतात,त्यांचे "शिक्षण" पूर्ण करण्यासाठी बँकेतून कर्ज काढतात, कालांतराने मुलीलानोकरी लागते . त्यानंतर विवाहासाठी स्थळ पहिले जाते ,त्यानंतर तिचे "लग्न" लावून दिले जाते . ज्या आई -वडिलांनी "हाडाची" काडे करून , रक्ताचे पाणी करून ,मुलीला शिकवलेले असते,त्या मुलीला गल्लेलठ पगार सुरु झाल्यावर ती मुलगी तो पगार त्या नवऱ्याला देते.
लग्न झाल्यावर अर्धा पगार आई -वडिलांचा द्यायची प्रथा सुरु झाली तर काय होईल ?? गरजवंत आई -वडिलांसाठी हे पैसे म्हणजे हा मोठा ठेवा ठरेल याचा मला विश्वास आहे .
आई -वडील 21 वर्षापर्यंत मुलीच्या उज्वल भविष्यासाठी सर्वोत्तम शिक्षणासाठी , उत्कृष्ठ क्लास लावतात . लाखो रुपये खर्च करतात ,स्वतः अर्धी भाकरी खातात परंतु मुलीला गरिबीची "जाणीव" करू देत नाहीत .मुलीचे आई -वडील कर्जाचे हफ्ते भरत गलितप्राण झालेले असतात .
ज्या आईवडिलांनी मुलीला शिक्षण दिले ,तिला आत्मनिर्भर बनवले , त्यांना तिने आपला अर्धा पगार द्यायला हवा की नाही ??
मुलीचे आई -वडील श्रीमंत असतील तर पैसे द्यायची गरज नाही. परंतु ज्या मुलीचे आई -वडील गरीब असतील त्यांचे काय ??
आई -वडिल आजारी असतात .त्यांना औषधोपचारासाठी पैसे लागतात , घरखर्चासाठी पैसा लागतो . मुलींसाठी पालकांनी सर्वस्व लुटलेले असते ,अशा परिस्थितीत त्या मुलीने अर्धा पगार आई -वडिलांना दिला तर त्यात वावगे काय ???
लहानपणापासून मुलीला "मोठे" करावयाचे , लग्न झाल्यावर काही मुली त्या आई वडिलांना वाऱ्यावर सोडतात . काही मुली आपल्या पालकांना "अनाथाश्रमात" देखील ठेवतात . मुलींचे हेच कर्त्यव्य आहे का ???
त्या आई -वडिलांना काय वाटत असेल ?? त्यांना किती दुःख होत असेल ? वृद्ध आई - वडिलांचा सांभाळ करणे, जसे मुलाचे कर्तव्य आहे ,तसे मुलीचेही कर्तव्य नाही का ???
प्रत्येक नोकरीधारक मुलीने आपल्या आई -वडिलांना आपला अर्धा पगार द्यावा. परोपकाराची ही मुहूर्तमेढ अनेक पिढ्यांसाठी "उपकारक" ठरेल याचा मला विश्वास आहे .
आ . इकबाल मुल्ला ( पत्रकार) संपादक -सांगली वेध ,
संपादक - वेध मीडिया न्यूज सांगली. मोबाईल - 8983587160
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा