संपादक------ हुसेन मुलाणी
टाइम्स 45 न्युज मराठी
मो.9730 867 448
आज दिनांक २८ ऑगस्ट, २०२३ रोजी रक्षाबंधनाच्या निमित्ताने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रावबहाद्दूर गट(बिजवडी) येथे राखी निर्मिती कार्यशाळा आयोजित केली.
सदर कार्यशाळेत शाळेचे मुख्याध्यापक श्री. श्रीकांत राऊत सर व श्री.अजमीर फकीर सर यांनी विद्यार्थ्यांना राखी बनविण्याचे प्रात्यक्षिक दाखवले . त्यानंतर विद्यार्थ्यांनी रंगीबेरंगी मणी, लोकर, रेशीम दोरा इत्यादींचा उपयोग करून विविध प्रकारच्या राख्या बनविल्या. यामध्ये तिरंगा राखी, फॅन्सी राखी, डिस्को राखी अशा विविध राख्या बनविण्यात आल्या.
एक राखी इस्रोतील शास्त्रज्ञांसाठी--
चंद्रयान-३ च्या यशस्वी मोहिमेचे अभिनंदन म्हणून इस्रोतील शास्त्रज्ञांसाठी विद्यार्थ्यांनी बनविलेली तिरंगा राखी पाठविण्यात येणार आहे.
सदरच्या राखी निर्मिती कार्यशाळेसाठी अंगणवाडी सेविका .सारिका चव्हाण व गिरीजा गेजगे यांचे अनमोल सहकार्य लाभले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा