Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, २९ ऑगस्ट, २०२३

*माळशिरस तालुक्यात पावसाने दडी मारल्यामुळे शेतकऱी हवालदिल झाला

 


गणेशगाव -----प्रतिनिधी

नुरजहाँ -----शेख

टाइम्स 45 न्युज मराठी

                              माळशिरस तालुक्यात पावसाने ओढ दिल्यामुळे ऐन पावसाळ्यात नदी,नाले,ओढे कोरडे पडले आहेत तर बोअर उचक्या मारू लागले.त्यामुळे बळीराजावर चारही बाजूने संकट येऊ लागल्यामुळे शेतकरी वर्ग चिंताग्रस्त झाला आहे.

    

     पावसाळा सुरू होऊन तीन महिने उलटून गेलेमुळे पावसाचे आगमन झाले नसल्यामुळे माळशिरस तालुक्यातील नद्या कोरड्या पडल्या आहेत,पिण्याच्या पाण्याची कमतरता जाणवू लागली आहे. जमिनी भेगाळल्या आहेत. शेतातील पिकांना पाणी कमी पडत असल्याने पिके करपून चालली आहेत.जनावरांच्या पिण्याच्या पाण्याबरोबरच चाऱ्याचा ही प्रश्न शेतकऱ्यासमोर आ वासून उभा आहे.ऊसासारख्या नगदी पिकांचे पार पाचोळ्यात रूपांतर झाले आहे.माळशिरस तालुक्यात मोठ्या प्रमाणात केळी लागवड झालेली आहे पाण्याभावी केळी रोपे करपून व पिचकुन चालली आहेत.त्यामुळे बळीराजाचेआर्थिक नियोजन पुर्णपणे कोलमडून पडले आहे. आणखी थोडे दिवस पाऊस नाही पडला तर अजून बिकट परिस्थिती निर्माण होऊ शकते.एकतर शेतकऱ्याच्या मालाला योग्य भाव मिळत नाही.त्यात पुन्हा शेतातील हातातोंडाशी आलेली पिके ही करपून चालली आहेत.गुराढोरांना जगवायचे कसे आणि शेतकऱ्याने जगायचे कसे असा यक्षप्रश्न पडल्याने बळीराजा चिंतातूर दिसत आहे.गुराढोरांना जगवण्यासाठी चारा छावण्यांची मागणी सरकारकडे केली जात आहे.शेतकऱ्याच्या करपलेल्या पिकांचा ही पंचनामा व्हावा व योग्य ती मदत मिळावी.एकरी सहा हजाराची मदत सरकार पंचनामा करून देत आहे म्हणजे हि मदत म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे.पेरलेल्या बियाणांची रक्कम याहून दुप्पट असते यापेक्षा ही भिक न घेतलेली बरी अशा मानसिक विवंचणेत सापडलेला शेतकऱ्यांची अवस्था दिसत आहे. शेतकऱ्यांच्या अडी अडचणी सोडवण्यात सरकारला वेळ नाही असे सध्याचे राजकीय वातावरण दिसत आहे.कोलमडलेल्या शेतकऱ्याने पुन्हा उभण्यासाठी मदत करणे गरजेचे आहे.जगाच्या पोशिंद्याला जगवण्यासाठी सरकारने तात्काळ पाऊल उचलली पाहिजे आसे शेतकऱ्यातून बोलले जाते आहे .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा