Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, २९ ऑगस्ट, २०२३

शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरचे प्रा.डॉ.काशिनाथ मोरे- पाटील यांचे दुःखद निधन

 


टाइम्स 45 न्यूज मराठी नेटवर्क 

अकलूज जिल्हा सोलापूर

 मो.9730 867 448

                         सोलापूर जिल्ह्याचे सुपुत्र व शिवाजी विद्यापीठ ,कोल्हापूरच्या भूगोल विषयाचे माजी विभाग प्रमुख प्राध्यापक "डॉ.काशिनाथ मोरे -पाटील " यांचे काल दिनांक 28/8/2023 रोजी रात्री कोल्हापूर येथे दुःखद निधन झाले . आज दिनांक 29/8/2023 रोजी सकाळी 10.30 वाजता पंचगंगा घाट, कोल्हापूर येथे अंत्यविधी झाला . 

डॉ. मोरे हे सुप्रसिद्ध भूगोल तज्ञ व उत्कृष्ट शिक्षक म्हणून प्रसिद्ध होते. त्यांचे अनेक संशोधनपर लेख राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जर्नल्स मधून प्रसिद्ध झाले असून त्यांनी अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये आपले संशोधनपर लेख सादर केले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थ्यांनी पीएच.डी. पदवी संपादन केली आहे. विद्यापीठाच्या विविध अधिकार मंडळावर त्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्यांच्या पश्चात त्यांचा मुलगा कोल्हापूरचे सुप्रसिद्ध विधीतज्ञ ॲड. मुकुंद मोरे ,सुनबाई, पत्नी, मुलगी ,बहिणी, भाऊ व नातवंडे असा फार मोठा परिवार आहे. त्यांच्या शैक्षणिक कारकिर्दीत त्यांनी अनेक विद्यार्थी घडवले आहेत .अत्यंत मितभाषी ,नम्र प्रेमळ व सर्वांना वेळोवेळी अडीअडचणीत मदत व सहकार्य करणारे डॉ.मोरे यांचे निधना मुळे शिक्षण क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा