अकलूज ------प्रतिनिधी
शकुर --तांबोळी
मो.-9860 112 351
तालुकास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत 38 किलो वजनगटात सदाशिवराव माने विद्यालय अकलूज मधील राजविर दुर्योधन मोरे याचा प्रथम क्रमांक आला.त्याची जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे.यामुळे विद्यालयाच्यावतीने मुख्याध्यापक अमोल फुले व उपमुख्याध्यापक दत्तात्रय घंटे यांनी त्याचा सत्कार केला.
शिक्षण प्रसारक मंडळ अकलूजचे मार्गदर्शक संचालक जयसिंह मोहिते-पाटील,अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते-पाटील,संचालिका स्वरूपाराणी मोहिते-पाटील,सचिव अभिजित रणवरे व सहसचिव हर्षवर्धन खराडे पाटील यांनी त्यांच्या पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
विद्यालयातील क्रीडा शिक्षक संजय राऊत,भीमाशंकर पाटील,भीमराव दुधाळ व तानाजी शिंदे यांचे त्याला मार्गदर्शन लाभले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा