इंदापूर तालुका -प्रतिनिधी
एस बी तांबोळी.
मो.-8378 081 147
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ओझरे येथे ७७ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी सरपंच प्रतिनिधी रणजीत वाघमोडे, उद्योजक अनिल शिंदे, वीर पिता दत्तात्रेय रास्ते यांचे हस्ते ध्वजवंदन करण्यात आले.
स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमा निमित्ताने शाळेतील विद्यार्थ्यांनी इंग्रजी व मराठीतून उत्तम मनोगते व्यक्त केली. तसेच सांस्कृतिक कार्यक्रम, लेझीम, नृत्य विद्यार्थ्यांनी सादर करून उपस्थितांची मने जिंकली. यावेळी उद्योजक अनिल शिंदे यांचे कडून शाळेतील विद्यार्थ्यांसाठी शालेय शूज वाटप करण्यात आले. तसेच वज्रेश्वरी कृषी केंद्राचे मालक मालोजी बोडके यांच्यातर्फे वह्या, पुस्तक, पेन, लेखन साहित्य वाटप करण्यात आले.
गुणवंत विद्यार्थी म्हणून कु ईश्वरी सचिन शिंदे हिला गौरविण्यात आले.
यावेळी शहाजी देवकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन मुख्याध्यापक विजय पाटील यांनी केले. तर शालेय विद्यार्थ्यांना विविध प्रकारची मदत करणाऱ्यांचे शाळेच्या वतीने उपशिक्षिका निशा बागड यांनी आभार व्यक्त केले. कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्य, आजी माजी पदाधिकारी, ग्रामस्थ, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो - ओझरे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ध्वजवंदन उत्साहात संपन्न.
--------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा