मुख्य संपादक -हुसेन मुलाणी टाइम्स- 45 -न्यूज
मो.9730 867 448
पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांचे अधिपत्याखाली अकलुज पोलीस ठाणे हदिदत मोटार सायकल चालवत असताना मोबाईल फोनवर बोलून स्वतःचे व इतर लोकांचे जिवीतास धोका निर्माण होईल अशारितीने वाहन चालवणारे वाहन चालक यांचेवर कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे. अशा प्रकारे मोटार सायकल चालवणारे वाहन चालकांवर दोन दिवसात भादवि कलम ३३६ प्रमाणे ९ गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत यापुढेही अशा प्रकारची कारवाई चालूच राहणार आहे. तसेच विना लायसन्स, विना नंबर प्लेट, विना लायसन्स, फॅन्सी नंबर प्लेट लावून वाहन चालवणे, वाहनांचे सायलन्सर बदलून वाहन चालविणे यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे तसेच अल्पवयीन मुलांना वाहन चालवण्यास न देण्याबददल अवगत करण्यात आले आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक हिंमत जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी, अकलुज विभाग, डॉ. सई भोरे पाटील यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली आहे.
पोलीस निरीक्षक,
अकलुज पोलीस ठाणे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा