कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखाना सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक एफ. आर .पी. देणारा कारखाना
पोळा सणासाठी प्रति मेट्रिक टन 100 रु प्रमाणे ऊस बिल बँकेत वर्ग
श्रीपूर ---ज्येष्ठ पञकार
बी.टी.शिवशरण
टाइम्स 45 न्युज मराठी
मो.-9527 456 958
कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याने गळीत हंगाम 2022-23 मध्ये गाळप केलेल्या ऊसास प्रती मे. टन रू.100/- प्रमाणे ऊस बिल बँकेत वर्ग केले असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर ऊस बिलाची एकूण रक्कम रू.10 कोटी जमा केली आहे. कारखान्याने नेहमीच शेतकऱ्यास पोळा, दिपावली सारख्या सणासाठी योग्यवेळी पैसे उपलब्ध करुन दिलेले आहेत. पोळा सणासाठी हप्ता देणेची परंपरा यावर्षी देखील कायम ठेवीत ''शेतकरी हिताय, कामगार सुखाय'' या उक्ती प्रमाणे मोठया मालकांच्या आदर्शाचा वारसा कारखान्याचे व्हा.चेअरमन, संचालक मंडळ, कार्यकारी संचालक, अधिकारी, कर्मचारी व उस उत्पादक शेतकरी यांच्या सहकार्याने यापुढेही असाच सुरु राहील असे कारखान्याचे चेअरमन मा.आ.श्री.प्रशांतराव परिचारक(मालक) यांनी सांगितले यावेळी कारखान्याचे व्हा.चेअरमन मा.श्री. कैलास खुळे व कार्याकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी आदी उपस्थित होते.
कारखान्याचे चेअरमन मा.आ.श्री.प्रशांतराव परिचारक(मालक) यांच्या मार्गदर्शनाखाली गळीत हंगाम 2022-23 अत्यंत उत्कृष्ठपणे चालला असून ऊस उत्पादक शेतकऱ्यांनीही कारखान्याच्या व्यवस्थापनावर विश्वास ठेवून या हंगामात कारखान्यास ऊस देवून सहकार्य केले आहे. मा.आ.श्री.प्रशांतराव परिचारक(मालक) यांच्या सुयोग्य नियोजनामुळे गळीत हंगाम 2022-2023 मध्ये कारखान्याने जिल्हयात प्रथम क्रमांकाचा साखर उतारा मिळविला असून जिल्हयात प्रथम क्रमांकाचा ऊस दरही देणार आहे. आजपर्यंत कारखान्याने प्रति मे.टन रू.2600/- प्रमाणे ऊस बील अदा केलेले आहे. ऊर्वरित एफ.आर.पी. ची रक्कम दीपावली सणावेळी अदा करणार आहोत. चालू हंगामात आसवनी प्रकल्पामधून वाढीव क्षमतेनुसार इथेनॉल व उपपदार्थाची निर्मिती केली आहे. तसेच ज्यूस टू इथेनॉलचीही निर्मिती केली आहे त्याचबरोबर पुढील हंगामात कारखान्याचे विस्तारीकरण होणार असून ऊस गाळप प्रती दिन 9,000 मे.टन प्रमाणे होणार आहे. गाळप हंगाम 2022-23 मध्ये कारखान्याने 9.61 लाख मे. टन ऊस गाळप करून 11.50% सरासरी साखर उताऱ्याने 9.55 लाख क्विं. साखरेचे उत्पादन घेवून कारखान्याने उद्दीष्ठपुर्ती केली आहे. पुढील हंगामासाठी कारखान्याकडे 11 लाख मे.टनाच्या ऊस नोंदी आहेत.
गळीत हंगाम 2022-23 मध्ये गाळप केलेल्या ऊसास पोळा सणासाठी प्रती मे. टन रू.100/- प्रमाणे ऊस बील दिलेमुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे. शेतकऱ्यांना महत्वाचा असणारा पोळा सण हा मोठ्या आनंदात साजरा करणेसाठी पैशाची गरज असताना कारखान्याने ऊस बिलाची रक्कम बँकेत खात्यावर वर्ग केली असल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण आहे.
कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी यांनी सांगितले की, गळीत हंगाम 2023-24 हा वाढीव कार्यक्षमतेने चालविणेसाठी कारखान्याचे चेअरमन मा.आ.श्री.प्रशांतराव परिचारक(मालक), व्हा.चेअरमन मा.श्री. कैलास खुळे सर, कारखान्याचे संचालक, अधिकारी व कामगार वर्गाच्या सहकार्याने कारखान्यामधील सर्व कामे अंतिम टप्प्यात असून ती लवकरच पुर्ण होऊन गाळप हंगाम वेळेवर सुरु केला जाणार आहे. त्यासाठी आवश्यक असणारी तोडणी व वाहतुक यंत्रणा सक्षमपणे उभारली आहे.
यावेळी कारखान्याचे व्हा.चेअरमन कैलास खुळे व संचालक दिनकरराव मोरे, वसंतराव देशमुख, उमेशराव परिचारक, दिलीपराव चव्हाण, ज्ञानदेव ढोबळे, तानाजी वाघमोडे, बाळासो यलमर, भगवान चौगुले, लक्ष्मण धनवडे, भास्कर कसगावडे, भैरू वाघमारे, गंगाराम विभुते, हणमंत कदम सुदाम मोरे विजय जाधव, किसन सरवदे, शामराव साळुंखे, राणू पाटील, तंज्ञ संचालक दाजी पाटील, दिलीप गुरव कारखान्याने कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी आदी उपस्थित होते.
यशवंतराव कुलकर्णी
कार्यकारी संचालक,
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा