Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, ८ सप्टेंबर, २०२३

वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा

 बँक ऑफ इंडिया माळेवाडी शाखा येथे 118 वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा


अकलूज -----प्रतिनिधी

केदार---लोहकरे

टाइम्स 45 न्युज मराठी

मो-9890 095 283

                       बॅंक ऑफ इंडिया देशातील अग्रगण्य बॅंकांपैकी एक बॅंक असून या बॅंकेचा ११८ वा वर्धापन दिन शंकरराव मोहिते महाविद्यालय माळेवाडी या शाखेत विविध कार्यक्रमांचे आयोजन करून मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला.याप्रसंगी शाखेचे प्रबंधक विश्वास मुलगिर यांनी बॅंकेचा गौरवपूर्ण इतिहास सांगत देशाच्या अर्थव्यवस्थेत असलेले बॅंकेचे योगदान नमूद केले तसेच वर्धापन दिन महोत्सवात रूपये ६० लाखांचे कर्ज वितरण समाजाच्या विविध घटकांसाठी केल्याचे सांगितले.या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.रामलिंग सावळजकर होते तर प्रमुख पाहुण्या म्हणून सावित्रीबाई फुले लोकसंचलित साधन केंद्राच्या सौ.तनुजा पाटील उपस्थित होत्या.

            या प्रसंगी मार्गदर्शन करताना प्रा.सावळजकर म्हणाले की,बॅंकेच्या सर्व स्टाफचे मिळत असलेले सहकार्य समाजाच्या आर्थिक उन्नतीचे प्रतिक असून बॅंकेला परमेश्वराची उपमा दिली तर वावगे ठरू नये.तर सौ.तनुजा पाटील यांनी बॅंकेकडून महिला बचत गटांना होत असलेल्या वित्त पुरवठ्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना नियमित कर्ज परतफेडीची ग्वाही दिली.

         यावेळी बॅंकेचे अधिकारी नितीन फासे यांनी बॅंकेच्या विविध ठेव योजनांची माहिती देताना वर्धापन दिनाचे औचित्य साधून बॅंकेच्या नव्याने अनावरण झालेल्या बीओआई मोबाईल ओम्नी ॲपची वैशिष्ट्ये नमूद केली तर कर्ज वितरण विभागाचे प्रमुख रवि तेजा यांनी विविध कर्ज योजनांची माहिती दिली.

            या कार्यक्रमाला विविध बचत गटांच्या प्रतिनिधी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.बॅंकेचे ग्राहक सचिन शेंडे यांनी शाखा प्रबंधक विश्वास मुलगिर यांचा सत्कार केला.तसेच सर्व स्टाफ सदस्यांचे आभार मानले.

              या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरज माने यांनी केले तर आभार प्रदर्शन ओंकार बिरादार यांनी केले.यावेळी सौ.शिंदे,सौ.जगताप,ओंकार कुलकर्णी,धनंजय जाधव,अनिल एकतपुरे,ओंकार बोत्रे,मेजर पवार इ.मान्यवर व कर्मचारी उपस्थित होते.

              

ठळक विशेष


बीओआई मोबाईल ओम्नी निओ ॲपचे अनावरण, बॅंकेच्या मुंबई स्थित प्रधान कार्यालयाने वर्धापन दिनी सदर ॲपचे अनावरण केले असून ग्राहकांसाठी सुलभ अशी नाविण्यपूर्ण वैशिष्ट्ये यात समाविष्ट आहेत.सदरचे ॲप हे प्ले स्टोअर व ॲप स्टोअरवर उपलब्ध असून अधिकाधिक ग्राहकांनी याचा नियमित वापर करण्याचे आवाहन बॅंक करीत आहे.







कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा