काही ओबीसी नेत्यांची चुकीची ओरड -----पुरुषोत्तम खेडेकर
संपादक----हुसेन मुलाणी
टाइम्स 45 न्युज मराठी
मो.-9730 867 448
मराठवाड्यातील मराठा म्हणून ओळख असलेल्या कुटुंबांची प्रत्यक्षात सरकारी दप्तरी नोंद निजामशाही पासून म्हणजेच सुमारे दोनशे वर्षांपासून कुणबी आहे . कुणबी म्हणजे शेतकरी . इंग्रज व शेकडो अन्य मानवशास्त्रज्ञांनी मराठा व कुणबी एकच असल्याचे वेळोवेळी सिद्ध केले आहे . तसेच महाराष्ट्र शासनाने नेमलेल्या राज्य मागासवर्ग आयोगाने देखील हीच मांडणी केलेली आहे . असे असतानाही आजतागायत मराठवाड्यातील मराठा समाजाला गाव रजिस्टर , शाळा दाखले अशा ठिकाणी शंभर पेक्षा जास्त वर्षांपासून कुणबी नोंद असूनही ओबीसी आरक्षण नाकारण्यात आले आहे . हा सामाजिक अन्याय ठरवून झाला आहे . तर आंध्र प्रदेश कर्नाटक तेलंगणा मधील मराठा समाजाला ओबीसी आरक्षण लागू केले आहे .
तर त्याचवेळी मराठवाड्यातील कमीतकमी तीन पिढ्यांचे भरुन न निघणारे नुकसान झाले आहे .. ते कमी करण्यासाठी मराठवाड्यातील मराठा समाजाला सरसकट कुणबी दाखले द्यावेत अशी मागणी शिवश्री मनोज जरांगे पाटील यांनी केली होती .... ती योग्य आहे ...
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने मध्यमार्ग काढून ज्यांच्या नोंदी कुणबी, कुणबी मराठा व मराठा कुणबी आहेत त्यांना ओबीसी आरक्षण देण्याची हक्काची मागणी मान्य केली आहे . यात ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागला नाही . याउलट साठ वर्षांपासून मराठा समाजाचे नाकारलेले ओबीसी आरक्षण परत करण्याची गरज आहे . कारण तो लाभ अन्य ओबीसींना मिळाला आहे ...
थोडक्यात काही ओबीसींचे स्वयंघोषित नेते समाजातील बंधुभाव एकात्मता शांतता बिघडवणारी वक्तव्ये करत आहेत असे लक्षात येते . त्यांनी झोपेचे सोंग न घेता सत्य समजून घेणे गरजेचे आहे .. चूकीची ओरड बंद करावी अशी विनंती आहे .
प्रा डॉ रावसाहेब कसबे यांच्या क्लिप मुळे मराठा कुणबी समाज अतिशय नाराज आहे. त्यात भर टाकू नये यासाठी ही विनंती आहे .
+ पुरुषोत्तम खेडेकर चिखली .
दिनांक ८-९-२०२३ .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा