दोन हजारच्या नोटा 30 सप्टेंबर पर्यंत च चलनात आसणार --यापुढे मुदत वाढ नाही-राज्यमंञी पंकज चौधरी.
संपादक---- हुसेन मुलाणी
टाइम्स - 45 -न्युज मराठी
मो.9730 867 448
भारतीय रिझर्व बँक (आर.बी.आय) ने 2000 ची नोट 30 सप्टेंबर2023 पर्यंत चलनात असेल असे निर्देश दि.19मे 2023 रोजी दिले होते त्या अनुषंगाने 2000 च्या नोटा बँकेत जमा बदलून घेण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2023 असून आज तागायत आर.बी.आय कडे 93% नोटा जमा झाले असल्याचे सांगण्यात आले आहे. आणखी 7% टक्के नोटा जमा झाल्या नसल्याचे ही आरबीआय कडून सांगण्यात आले आणखी ज्या कोणाकडे 2000 च्या नोटा असतील त्यांनी अंतिम मुदत 30 सप्टेंबर 2023 पूर्वी जमा कराव्यात असे आदेश देण्यात आले आहेत. कारण 2000 च्या नोटा जमा करण्याची डेडलाईनला सरकार मुदत वाढ देणार नाही. आसे स्पष्ट केले असुन या अनुषंगाने संसदेत काही खासदारांनी 2000 च्या नोट बदली ला बाबत मुदत वाढ मिळेल काय? असा प्रश्न विचारला होता त्यावर अर्थ मंत्रालयाने सांगितले की रिझर्व बँकेने 19 मे 2023 रोजी 2000 हजार रुपयांच्या नोटा जमा करण्याचे आदेश दिले होते या मुदत वाढीच्या परिस्थितीवर खुलासा करताना वित्त मंत्रालयाने सांगितले की 2 हजार रुपयांच्या चलनात असलेल्या नोटा जमा करण्याची मुदत पुढे वाढवली जाणार नाही ज्याच्याकडे आणखी दोन हजारच्या नोटा असतील त्यांनी ती 30 सप्टेंबर पूर्वी जमा करणे अनिवार्य आसुन संसदेच्या पावसाळी अधिवेशना मध्ये बारामती च्या खासदार सुप्रिया सुळे सह अनेक खासदारांनी यासंदर्भात प्रश्न विचारले होते खासदारांच्या प्रश्नाला उत्तर देताना -राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी स्पष्ट केले होते कि या अंतिम मुदतीमध्ये कुठलाही बदल होणार नाही
त्यामुळे 2000 रु.च्या नोटबंदीची अंतिम तारीख वाढण्याची शक्यता धुसर झाली असून आता फक्त 4 दिवस बाकी राहिले असून नागरिकांनी चार दिवसाच्या आत 2000 हजाराच्या नोटा बँकेत जमा कराव्यात असेही सांगण्यात आले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा