Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, २६ सप्टेंबर, २०२३

अकलूजच्या मार्केटमध्ये" डाळिंब" दराची किमया न्यारी, बादशहाचा सत्कार करी सर्व शेतकरी

 अकलूजच्या बाजारपेठेत" डाळिंबा" ला चांगला दर मिळत असल्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण---

अकलूजच्या मार्केटमध्ये" डाळिंब" दराची किमया न्यारी, बादशहाचा सत्कार करी सर्व शेतकरी



अकलुज ---प्रतिनिधी

केदार लोहकरे

टाइम्स 45 न्युज मराठ

                        अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाजारपेठत डाळींबाला चांगला भाव मिळू लागल्यामुळे शेतकऱी वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे.ऐन सणासुदीच्या दिवसात डाळींबाला दर मिळाल्यामुळे बळीराजा सुखावला आहे.



           अकलुजच्या कृषी बाजार समितीच्या बाजारपेठतील डाळींबाच्या मार्केटला आता नव्याने डाळींबाची पंढरी म्हणून ओळख निर्माण झाल्यामुळे व दररोज लिलावात चढत्या भावाने शेतक-याच्या मालाची विक्री होऊ लागल्यामुळे शेतक-यांच्या खिशात चार पैसे राहू लागल्यामुळे ते आनंद आहेत.सध्या गणेशोत्सव, महालक्ष्मीचे आगमन झाले आहे.त्यात आता शेतकऱ्यांना धनलक्ष्मीचे प्राप्त होऊ लागली आहे.सध्या तालुक्यात दुष्काळ स्थिती असल्यामुळे म्हणावा असा पाऊस पडलेला नाही आहे.पण त्यातून हि शेतक-यांनी कमी पाण्यात जास्त उत्पन्न घेऊन भरपूर दर ही मिळवला आहे.

          नव्याने उदयास आलेली डाळीबाच्या बाजारपेठेला ज्या अनेक मान्यवर व्यक्ति व संस्था यांचा मोलाचा वाटा आहे.त्याच बरोबर तिथे असणाऱ्या आडत व्यापारी,कर्मचारी,शेतकरी यांचा सिंहाचा वाटा आहे.त्यासाठी नामांकित डाळींब व्यापारी मुन्नाभाई चौधरी,व फज्जूभाई चौधरी यांच्या बादशाह फ्रुट कंपनी व अन्य फर्मने शेतक-यांच्या हितासाठी त्यांचा माल वाढीव दराने,विश्वासाने विकत आहेत.त्यामुळे जवळच्या तालुक्यातील शेतकरी वर्ग विश्वासाने डाळिंब विक्रीसाठी आणतात.त्यासाठी मिळणारा दर हा सर्वोच्च असावा हिच भावना चौधरी बंधूची नेहमीच असते त्यांचे ग्राहकाशी,व्यापाऱ्याशी,व शेतकरी वर्गाशी जिव्हाळ्याचे, कौटुंबिक संबंध पाहता,एक अनोखा सत्कार समारंभ शेतकरी मधुकर ज्योती जाधव,बाबुराव बिडवे,संजय माने,नवनाथ जाधव,नाना घाडगे,रवी आप्पा जाधव डेप्युटी सरपंच,बापु बिडवे सर्व राहणार टाकळी (ता.माढा) रियाज शेख,रहीम शेख रा.लुमेवाडी (ता.इंदापूर),राम शिंदे,गणेश माने,धनंजय राऊत,पोपट कुबडे रा.बावडा या सर्वांनी सुरवातीपासुन बादशाह फ्रुट कंपनीचे मालक मुन्नाभाई चौधरी व फज्जूभाई चौधरी यांच्याकडे विश्वासाने डाळींब विक्री आणत आहेत तर चौधरी बंधू त्यांचा मालाला वाढीव दराने विकून,चांगला भाव मिळणे कामी सतत प्रयत्न करत आहे.सर्वांशी सलोख्याचे संबंध ठेवून त्यांच्या कार्याची पोच पावती म्हणून चौधरी बंधूंचा त्यांचे बादशाह फ्रुट कंपनी या पेढीवर शेतकरी वर्गांनी अनोखा कार्यक्रम घडवून आणला.चौधरी बंधूंचा शाल,फेटा, हार व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.या सत्कारामुळे चौधरी बंधू भारावून गेले.यापुढेही शेतकरी हाच आमचा केंद्रबिंदू मानून अकलुजच्या डाळींब मार्केटची व स्वतःच्या फर्मचे नाव लौकीकास पात्र ठरेल अशी ग्वाही याप्रसंगी राजुभाई बागवान,शाहरुख शेख यांनी दिली.यावेळी शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा