"जेव्हा संस्कार संपतात" तेव्हा "अंत्यसंस्कार करा नाहीतर मृतदेह फेकून द्या" असे बापाबद्दल मुलीचे निर्दयी वक्तव्य--- शेवटी ग्रामपंचायत कडून करण्यात आले अंत्यसंस्कार
संपादक----हुसेन मुलाणी
टाइम्स 45 न्युज मराठी
मो.-9730 867 448
निपाणी,
मुलांना चांगले शिक्षण देऊन विदेशात पाठविले पण वडिलांच्या निधनाची बातमी कळवल्यावर अंत्यसंस्कार करा नाहीतर मृतदेह फेकून द्या असे वक्तव्य निर्दयी मुलीने केले. शेवटी पोलिसांनी व ग्राम पंचायतीने निवृत्त बँक मॅनेजरच्या अंत्यसंस्कार केले.
पुणे शहरातील निवृत्त बँक मॅनेजर मुलचंद शर्मा यांना अर्धांग वायू झाला होता. त्यांचा मुलगा दक्षिण आफ्रिकेत उच्च पदावर गेला. कार्यरत असून मुलगी कॅनडात नोकरी करते. काही दिवसापूर्वी शर्मा यांची सेवा करणारा एक कंत्राटी नोकर त्यांना नागरमुनोळीतील पांडुरंग कुंभार यांच्या रुग्णालयात घेऊन आला होता. मात्र कंत्राट संपल्याने
तो शर्मा यांना चिकोडीतील शिवनेरी लॉजवर सोडून गेला. सदर बाब लॉजमालकाच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी चिकोडी पीएसआय बसणगीडा नेल यांना ही माहिती दिली. चिकोडी पोलिस घटनास्थळी दाखल झाले. शेवटी पोलिसांनी शर्मा यांना चिकोडी सरकारी रुग्णालयात दाखल केले. पण तेथील डॉक्टरनी अधिक उपचारासाठी त्यांना जिल्हा रुग्णालयात पाठविले. दिवसेंदिवस त्यांची प्रकृती खालावत होती. शनिवारी सदर वृध्द मरण पावल्याचे सूचनापत्र पोलिसांना आले. मृतदेह नागरमुनोळी गावाला आणला
तिथे ग्रा.पं. अध्यक्ष, सदस्य, पीडिओच्या मदतीने पोलिसांनी अंत्यसंस्कार केले. यावेळी पोलिसांच्या डोळ्यातही अश्रू तरळले.
शर्मा यांचे निधन झाल्यानंतर पोलिसांनी त्यांचा मुलगा व मुलीशी
अनेकवेळा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. शेवटी व्हॉट्सअँप कॉलवर मुलीशी संपर्क झाला. पोलिसांनी तिला तिच्या वडीलांचे निधन झाल्याची माहिती दिली. यावर मुलीने त्यांचा माझा काही संबंध नाही. आमच्या कुटुंबाचा विषय तुम्हाला कळणार नाही. तुम्हाला आम्ही उपचार द्या म्हणून सांगितलेले नाही. उगीच आम्हाला त्रास देऊ नका. तुम्हाला पुढील कार्य करायचे होत असल्यास करा. नाही तर मृतदेह फेकून द्या असे निर्दयी वक्तव्य केले.
"संस्कारांची कमतरता"
जिवंत असताना करोडपती लोक आपल्या मुलांना चांगले शिक्षण देऊन परदेशी पाठवतात. पण, त्यांच्यावर चांगले संस्कार करण्यास विसरतात. तेच शर्मा यांच्या बाबतीत दिसते, असे मत व्यक्त होत आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा