सांगली महापालिका अंतर्गत रस्ते मोकळा श्वास केव्हा घेतील--- इकबाल मुल्ला.
संपादक----हुसेन मुलाणी
टाइम्स 45 न्युज मराठी
मो.-9730 867 448
अतिक्रमण विषयी बोलूच त्याआधी ..राजस्थान मध्ये एका "प्रतिथयश" कंपनीच्या बिस्कीटपुड्यामध्ये 16 बिस्किटाऐवजी 15 बिस्कीट म्हणजेच फक्त 1 बिस्कीट कमी असल्याने, न्यायालयाने ग्राहकाच्या "तक्रारीनुसार" कंपनीला "1 लाख रुपये " दंड ठोठावला .
"महापालिका" जनतेचा पैसा घेऊन मूलभूत "सुखसुविधा" देत नसेल , रस्ते - गटारी -लाईट -पाणी हे "उच्च दर्जाची" देत नसेल तर महापालिकेच्या विरुद्ध अशीच कायदेशीर कारवाई होऊ शकेल का ??? न्यायालयात दाद मागण्याचा जनतेला अधिकार* आहे का ???
मुद्दा असा आहे ,सांगली महापालिकेचे रहिवासी महापालिकेची घरपट्टी -पाणीपट्टी व इतर कर नियमानुसार भरत असतील , महापालिकेला "सहकार्य" करत असतील तर ,महापालिकेच्या हद्दीतील रस्त्यातील जीवघेणे "खड्डे ",त्या खड्ड्यात पडून झालेले अपघात ,मृत्यू , आणि "शारीरिक" त्रास -व्याधी याला जबाबदार ठरवत एखाद्या नागरिकाने महापालिकेच्या विरुद्ध न्यायालयात तक्रार दाखल केली तर त्या याचिकाधारकाला "न्याय" मिळू शकेल का ?? झालेल्या दुखापती गृहीत धरून पैशाच्या स्वरूपात नुकसानभरपाई मिळेल का ???
एक बिस्कीट कमी आहे म्हणून न्यायालय बिस्कीटच्या कंपनीला 1 लाख दंड करू शकते तर ,सांगली महापालिका क्षेत्रात शेकडो अपघात , औषधोपचराला लाखो रुपये जनतेचे "खर्च" होत असतील तर न्यायालय महापालिकेला दंड आकारू शकणार नाही का ???
शहरात जीवघेणे - अक्राळविक्राळ स्पीडब्रेकर मुळे "पाठीचे कणे दुखावले जातात त्यांची "झीज" होते , दवाखान्यात हजारो रुपये "खर्च" होतात ,महिला -मुले अपघातग्रस्त होतात ,तेंव्हा एखादा नागरिक महापालिकेला "दोषी" ठरवत महापालिकेच्या विरुद्ध न्यायालयात *न्याय* मागेल का ???
जी "घरपट्टी" आकारली जाते ,त्यातील सर्व सुखसोई महापालिका नागरिकांना देते का ?? महापालिका "हद्दीत" केले जाणारे रस्ते 2 महिन्यात "उखडू" लागतात , त्यातील खडी - डांबर -आणि रस्त्याची कागदपत्रात असणारी "जाडी" व इतर बाबी तपासल्या तर लाखो रुपयांचा बोगस कारभार चव्हाट्यावर येऊ शकतो. तात्पर्य महापालिका अशा "ठेकेदाराकडून" नुकसानभरपाई घेईल का ???
"गावठाण" परिसरात गटारींची समस्या आ वासून उभी असताना किती गटारी नियमानुसार झाल्या किंवा नाही ?? याची माहिती मिळेल का ??
महापालिकेने 100 फुटी रस्त्यावरील शेकडो अतिक्रमणे हटवली .अतिक्रमणामुळे सदर रस्ता 100 फूट असताना 40 फूट दिसतो .तेथील अतिक्रमण हटवणे अगत्याचे होते ,परंतु रस्त्याच्या मधोमध 80 फुटाच्या आसपास विद्युत खांब उभे असल्यामुळे वाहनधारकांच्या सोयीसाठी 100 फूट रुंद रस्ता होऊ शकत नाही. हे खांब हटवल्याशिवाय रस्ता होऊच शकत नाही ही वस्तुस्थिती आहे .मग हे विद्युत खांब काढण्यासाठी महापालिका कधी "मोहीम" हाती घेणार ???
या रस्त्याच्या मधोमध जी सेंटर पट्टी आहे तेथे डांबरीकरण करने अत्यावश्यक आहे परंतु कित्येक वर्ष हा रस्ता असाच आहे .या रस्त्यावर शेकडो खड्डे आहेत ,दररोज अपघात घडतं आहेत ..सर्वप्रथम या सर्व मूलभूत गरजा तपासून ,नागरिकांना सुखसुविधा देऊन , उच्च दर्जाचे काम करून लोकांना सेवा देण्याऐवजी अतिक्रमणाचा फार्स कशाला ??
पेठभाग भाजी मंडई च्या मागील दरवाज्यासमोरील भागात 15 फूट रस्ता असताना धान्य दुकानदार 5-7 फूट रस्ता अडवून "धान्य पोती" लावतात .तेथे चारचाकी गाडी सहजपणे जायला हवी तथापि तेथे दुचाकी व पादचारी जाताना देखील कसरत करावी लागते. तेंव्हा अतिक्रमण विभाग हा रस्ता केंव्हा अतिक्रमणमुक्त करणार ???
मेनरोड जवळील "बालाजी मंदिराजवळील" बोळात चप्पल व्यवसायिकांनी 5 फूट रस्ता अडवला आहे .त्यांचा बंदोबस्त केंव्हा करणार ??
मेनरोड वर फळविक्रेते 4 -5 फूट पुढे आपले "स्टॉल" लावतात . अतिक्रमण गाडी आल्यावर "स्टॉल" मागे घेण्याचा "फार्स" केला जातो .गाडी गेल्यावर पुन्हा रस्त्यावर स्टॉल लावला जातो. या विक्रेत्यांना चाप कधी लावणार ???
अतिक्रमण च्या नावाखाली महापालिका आज 10000-15000 रुपयांचे बॅकलाईट बोर्ड ,जेसीबी लावून जमीनदोस्त करत आहेत . त्याची नुकसानभरपाई कोण देणार ???
स्टॅन्डबोर्ड घेऊन जाताना ,कित्येक बोर्ड खराब झालेत ,तुटलेत याला "जबाबदार" कोण ??
सांगलीचे आयुक्त .सुनील पवार हे एक विश्व्सनीय - कर्तव्यदक्ष व्यक्तिमत्व आहेत . त्यांच्याच पुढाकाराने सांगली महापालिकेच्या तिन्ही शहरांच्या विकासात्मक सुंदरतरेचे, " वैभवाचे" "सुखावह दर्शन" जेंव्हा होईल तो "दिवस " समस्त जनतेसाठी सुदीन ठरावा ! आणि सांगली महापालिके अंतर्गत रस्ते मोकळा श्वास केंव्हा घेतील हीच महत्त्वाची समस्या आहे.
.इकबाल मुल्ला ( पत्रकार )
संपादक -सांगली वेध ,
संपादक -वेध मीडिया न्यूज ,सांगली.
मोबाईल - 8983587160
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा