संपादक---- हुसेन मुलाणी
टाइम्स - 45 -न्युज मराठी
मो.9730 867 448
श्री शंकर सहकारी साखर कारखाना लि. सदाशिवनगर कारखान्याची वार्षिक सर्व साधारण सभा आज खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. याप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, सहकार महर्षी कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते पाटील, विधान परिषदेचे आमदार तथा श्री शंकर सहकारी चे चेअरमन. रणजितसिंह मोहिते पाटील, विधानसभेचे आमदार . राम सातपुते, शिवामृत दूध संघांचे चेअरमन धैर्यशील मोहिते पाटील, जि प माजी उपाध्यक्ष . बाबाराजे देशमुख, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती मामासाहेब पांढरे, सहकार महर्षी कारखान्याचे व्हा. चेअरमन शंकरराव माने देशमुख, सूतगिरणीचे चेअरमन सुभेदार आप्पा काळे, पंचायत समितीचे माजी उपसभापती . अर्जुनसिंह मोहिते पाटील, आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी चेअरमन रणजितसिंह मोहिते पाटील बोलताना सांगितले की, श्री शंकर सहकारी FRP पेक्षा १३५ रु ज्यादा दर देणार असून दिवाळी मध्ये उर्वरित रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येणार आहे. तसेच कारखान्याच्या साखर प्रकल्पाच्या प्रस्तावित विस्तारीकरण कामाच्या भांडवली खर्चास मंजुरी घेण्याचा ठराव बहुमताने मंजूर करण्यात आला.
तसेच यावेळी कारखान्याचे व्हा. चेअरमन मिलिंद कुलकर्णी यांनी सभेचे प्रास्ताविक केले, तर सभेचे विषय वाचन जनरल मॅनेजर रविराज जगताप यांनी केले व आभार संचालक दत्तात्रय रणवरे यांनी मानले.
यावेळी एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर स्वरूप देशमुख, कार्यकारी संचालक अभिजित डुबल, कारखान्याचे सर्व संचालक, सभासद शेतकरी, व्यापारी, ग्रामस्थ, कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा