सर्वसामान्यांचा आवाज बुलंद करणारा नेता" धैर्यशील मोहिते पाटील"------
मराठा आणि धनगर समाज बांधवांनी काढलेल्या मोर्चात त्यांनी सर्वसामान्य कार्यकर्त्यात मिसळून लावलेले हजेरी अनेकांना भावली
पञकार ---डी.एस.गायकवाड.
अकलुज.
मो.9890 153 330
राजकारण राजकारणाच्या ठिकाणी आणि समाजकारण समाजकारणाच्या ठिकाणी... जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी अहोरात्र विचार करून त्यासाठी तत्परतेने कार्य करणारी माणसे तशी आजकाल थोडीच पाहायला मिळतात...
जनतेच्या अंतर्मनातील भावनांना न्याय मिळवून देत असताना अनेक जण राजकारण करताना आपली पोळी भाजून घेतात पण याला अपवाद ठरले आहेत ते म्हणजे धैर्यशील मोहिते पाटील... राज्यात मराठा आंदोलनासह ओबीसी धनगर बांधव देखील आपल्या हक्काच्या आरक्षणासाठी रस्त्यावर उतरलेला पहावयास मिळत आहे. माळशिरस तालुक्यात अकलूज येथे मराठा समाजाने आरक्षणासाठी आंदोलन केले त्याचबरोबर धनगर समाज बांधवांनी देखील आपल्या हक्काच्या आरक्षणासाठी आंदोलन केले.
या आंदोलनाच्या निमित्ताने अनेक जणांनी स्वतः ला फ्लॅश होण्याचा प्रयत्न केला.. या दोन्हीही आंदोलनात पुढे पुढे करून आपली नेतेगिरी दाखवणारी मंडळी देखील दिसली. सर्वसामान्य समाज बांधव मात्र आपल्या अंतर्मनातील भावनांना न्याय मिळावा म्हणून या दोन्ही आंदोलनात सहभागी झालेला दिसला... मला एक गोष्ट या दोन्हीही आंदोलनात प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे धैर्यशील मोहिते पाटील यांच्या सामान्यपणाची... या दोन्हीही आंदोलनात धैर्यशील मोहिते पाटील अगदी मनापासून सहभागी झालेले दिसले... सर्वसामान्यात मिसळून, कुठेही पुढे पुढे न करता लोकांच्या अंतर्मनातील भावनांना त्यांनी ताकद दिली... अकलूज येथे झालेल्या मराठा आरक्षण आंदोलनात ते कार्यकर्त्यांमध्ये मिसळून सहभागी झालेले दिसले... तर माळशिरस येथे झालेल्या धनगर समाज बांधवांच्या आंदोलनात अगदी रस्त्यावर बसून त्यांनी आंदोलनाची ताकद वाढवली... लोकांचे प्रश्न सुटावेत, लोकांना न्याय मिळावा.. म्हणून चाललेली त्यांची ही प्रामाणिक धडपड खरोखरच एका महान नेतृत्वाचे लक्षण ठळकपणे अधोरेखित करणारी वाटते. आंदोलने न्याय हक्क मिळवण्यासाठी असतात ती चमकोगिरी करण्यासाठी नसतात हेच खऱ्या अर्थाने धैर्यशील भैयानी दाखवून दिले आहे.. आरक्षण प्रश्नावरून सद्यस्थितीला सर्वसामान्य लोकांच्या भावना तीव्र आहेत... आणि याच भावनांना न्याय मिळावा यासाठी धैर्यशील मोहिते पाटील स्वतः सर्वसामान्य लोकांत मिसळून त्यांचा आवाज बुलंद करण्याचा प्रयत्न करत आहेत हेच यानिमित्ताने स्पष्ट होते. कधीच या नेतृत्वाने बडेजाव पणाचा आव आणला नाही. नेहमी लोकात मिसळून कामे करणे, त्यांची दुःखे समजून घेणे, आणि त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी अविरतपणे अगदी मनोमन प्रयत्न करणे हेच या नेतृत्वाचे वैशिष्ट्य राहिले आहे. म्हणूनच या दोन्ही आंदोलनाचे निरीक्षण केले असता या नेतृत्वाने सर्वसामान्यात मिसळून एक सामान्य कार्यकर्ता म्हणून बजावलेली भूमिका प्रेरणादायी वाटते... राजकारण तर अनेक जण करत असतात पण ते कशात करावे याची जाणीव प्रत्येकाने ठेवली पाहिजे. म्हणूनच धैर्यशील मोहिते पाटील ग्रेट वाटतात.... सर्वसामान्यांचा ते बुलंद आवाज वाटतात.... त्यांनी या दोन्ही आंदोलनात मिसळून वटवलेली सर्वसामान्य कार्यकर्त्यांची भूमिका खरोखरच भावली आहे.. म्हणूनच या नेतृत्वाची उंची आणि विचार करण्याची पातळी आभाळा एवढी वाटते...इतकेच....
- डी एस गायकवाड, पत्रकार







कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा