तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत "लक्ष्मीबाई कन्या प्रशाले "चे घवघवीत यश---
26 विद्यार्थिनींची जिल्हास्तरावर निवड
संपादक----हुसेन मुलाणी
टाइम्स 45 न्युज मराठी
मो.-9730 867 448
दि. 4 व 5 सप्टेंबर रोजी शंकरराव मोहिते महाविद्यालय ,माळेवाडी अकलूज येथे झालेल्या मैदानी स्पर्धेत 400 मीटर रिले ,100 मीटर धावणे , क्रॉस कंट्री , गोळा फेक ,थाळीफेक, 100 मीटर अडथळा ,400 मीटर अडथळा अशा विविध स्पर्धेत प्रशालेतील विद्यार्थिनींनी घवघवीत यश संपादन केले,तब्बल 26 विद्यार्थिनींची जिल्हास्तरावर निवड झाली.
यशस्वी सर्व विद्यार्थिनींचे शिक्षण प्रसारक मंडळाचे मार्गदर्शक संचालक जयसिंह मोहिते -पाटील, अध्यक्ष
संग्रामसिंह मोहिते- पाटील ,संस्थेच्या संचालिका तथा प्रशालेच्या सभापती कु.स्वरूपाराणी मोहिते -पाटील, सचिव अभिजित रणवरे ,सहसचिव हर्षवर्धन खराडे ,प्रशाला समिती सदस्य व मुख्याध्यापिका गायकवाड मॅडम यांनी कौतुक व अभिनंदन केले .सर्व यशस्वी विद्यार्थिनींना क्रीडा शिक्षक बनसोडे सर यांचे मार्गदर्शन लाभले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा