काक्रंबा ता. तुळजापूर येथील उड्डाणपूला साठी
खासदार -ओमराजे निंबाळकर यांच्या पाठपुराव्यामुळे निधी मंजूर झाल्याने ग्रामस्थांमध्ये एकच जल्लोष.
संपादक----हुसेन मुलाणी
टाइम्स 45 न्युज मराठी
मो.-9730 867 448
धाराशिव लोकसभा मतदार संघाचे खासदार, ओम प्रकाश राजे निंबाळकर व तुळजापूर तालुका शिवसेना( उद्धव बाळासाहेब ठाकरे) चे तालुका सोशल मीडिया प्रमुख चेतन बंडगर यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे अखेर काक्रंबा येथील उड्डाणपुलास 25 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाल्याने काक्रंबा गावातील युवा आणि नागरिकांनी फटाक्याची अतिशबाजी व जल्लोष व्यक्त करून एकमेकांना पेढा भरवून आनंदोत्सव साजरा केला
तसेच या उड्डाणपुलास निधी प्राप्त होऊन तातडीने काम मार्गी लागणार असल्याने-- खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर व सोशल मीडिया प्रमुख चेतन बंडगर यांचे काक्रंबा ग्रामस्थांच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले
याप्रसंगी काक्रंबाचे प्रथम नागरिक व सरपंच कालिदास खताळ, गणपत सुरवसे, नरसिंग भिसे, युवा सेना- शाखाप्रमुख, दीपक भिसे ,शहाजी नन्नवरे ,नंदू भिसे ,बालाजी गोडसे, ग्रामपंचायत सदस्य -सद्दाम मुलाणी , विकास भिसे, शेखर भिसे, गणेश झोंबाडे ,कार्तिक वाघमारे, लखन थोरात, महादेव क्षीरसागर ःकिरण भिसे , युवराज भिसे ,तसेच बहुसंख्येने ग्रामस्थ व शिवसैनिक उपस्थित होते
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा