Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, ११ सप्टेंबर, २०२३

लीलावती सदाशिवराव माने पाटील यांचे निधन हिंदुराव दादा माने पाटील यांना मातृशोक.

 


            💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

टाइम्स 45 न्यूज मराठी

मो.9730 867 448

                    अकलूज बागेवाडी (पाटील वस्ती ) येथील लीलावती सदाशिवराव माने पाटील यांचे सोमवार दि 11 सप्टेंबर रोजी सकाळी 8.30 वा अल्पशा आजाराने निधन झाले मृत्यू समयी त्यांचे वय 96 वर्षे इतके होते धर्मवीर सदाशिवराव माने पाटील यांच्या त्या पत्नी होत्या त्यांच्या पश्चात 4 मुली, मुलगा हिंदुराव माने पाटील, नातू सुजयसिंह माने पाटील, अजिंक्य माने पाटील, नात सुना असा मोठा परिवार आहे . राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष फत्तेसिंह माने पाटील व अकलूजचे माजी सरपंच किशोरसिंह माने पाटील यांच्या त्या चुलती होत्या.


    धर्मवीर सदाशिवराव माने पाटील यांना खंबीरपणे साथ देणाऱ्या व अकलूजच्या माने पाटील कुटुंबियांचा आधारवड असणाऱ्या लीलावती माने पाटील यांच्या जाण्याने माने पाटील परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला त्यांच्या पार्थिवावर सोमवार दि 11 सप्टेंबर रोजी दुपारी 3.00 वाजता अकलूज बागेवाडी (पाटील वस्ती) येथील शेतात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे हिंदुराव( दादा) माने पाटील आणि माने पाटील कुटुंबीयांवर जो दुःखाचा डोंगर कोसळला आहे त्यातून माने पाटील कुटुंबियांना सावरण्याची शक्ती मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा