विशेष प्रतिनिधी---कासिम मुलाणी
टाइम्स 45 न्युज मराठी
अकलूज नगरपरिषद हद्दीतील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, सध्या अकलूज परिसरातील नीरा नदीमध्ये पुरेसे पाणी उपलब्ध नसल्यामुळे यंदाचे गणेशोत्सवानंतर श्री गणेश मूर्तींचे विसर्जन आपणास जेथे पाणी उपलब्ध आहे त्या ठिकाणी करावे लागणार आहे.अकलूज नगरपरिषद तर्फे यंदा मूर्ती संकलन वाहना द्वारे घरोघरी येऊन सर्व मूर्तीं संकलीत करण्यात येणार आहे. तसेच जे नागरीक विसर्जन घाटावर येणार आहेत त्यांच्या गणेश मूर्ती देखील नगरपरिषद कडून संकलीत करण्यात येणार आहे.सर्व संकलीत करण्यात आलेल्या गणेश मूर्ती विसर्जन अकलूज नगरपरिषद तर्फे विधीवत पद्धतीने जेथे पाणी उपलब्ध आहे त्या ठिकाणी करण्यात येणार आहे. तरी सर्व नागरिकांनी सार्वजनिक व घरगुती मूर्ती नगरपरिषदेस देऊन सहकार्य करावे. जेणेकरून आपल्या लाडक्या बाप्पाचे विसर्जन योग्य पद्धतीने होईल.असे सर्व नागरिकांना आवाहन अकलूज नगरपरिषदेच्या वतीने करण्यात येत आहे.
आपला
मुख्याधिकारी
*अकलूज नगरपरिषद अकलूज
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा