Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, ६ सप्टेंबर, २०२३

TEACHER'S DAY



इंदापूर तालुका...... 
प्रतिनिधी एस. बी. तांबोळी,
मोबाईल -8378081147


शिक्षक दिनानिमित्त लुमेवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या इयत्ता सातवीच्या विद्यार्थीनी स्वतः शिक्षिका बनल्या होत्या. आज पुर्ण वेळ शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली मुलींनी शाळा चालवली. परिपाठ पासून संध्याकाळी वंदे मातरम् होईपर्यंत शिक्षकांची धुरा समर्थपणे सांभाळली. आनंदाने आणि कर्तव्य दक्षतेने त्यांनी जबाबदारी पार पाडली. वर्गातील अध्यापन, मुलांचा अभ्यास तपासणे याबाबी काळजीपूर्वक केल्या. आपण आज शिक्षिका आहोत याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. एक नाविन्यपूर्ण उपक्रम लुमेवाडी शाळेत राबवण्यात आला.


     डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्म दिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापक दत्तात्रय चव्हाण सर यांनी केले. प्रास्ताविक अनंत खाडे सर यांनी केले. तसेच सर्वांच्या वतीने डॉ उषा भोईटे यांनी मनोगत व्यक्त केले. आज मुलींनी इतक्या आत्मविश्वासाने अध्यापन केले त्याबद्दल त्यांचे कौतुक केले. आजच्या सर्व शिक्षिका विद्यार्थिनी यांचा सत्कार मुख्याध्यापक व सर्व शिक्षकांनी केला. यावेळी सौ मंदा उतळे मॅडम, श्रीमती राणी बाड मॅडम यांनीही विद्यार्थांना मार्गदर्शन केले.
    सदरचा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी वर्गशिक्षक संतोष आव्हाड सर, योगेश पांढरे सर, सातपुते सर यांचे देखील मार्गदर्शन लाभले. बावडा बिटचे विस्तार अधिकारी खळदकर साहेब व पिंपरी केंद्राच्या केंद्रप्रमुख सौ. सुनिता कदम मॅडम यांनी शिक्षक दिनाच्या या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले.
---------------------------


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा