Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, २७ सप्टेंबर, २०२३

इंदापूर तालुक्यातील आठ रस्त्यांसाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून तब्बल १९ कोटी ४५ लाख मंजूर - माजी राज्यमंत्री व आमदार दत्तात्रय भरणे

 


इंदापूर तालुका...... प्रतिनिधी एस. बी. तांबोळी, मोबाईल-8378081147

                   : माजी राज्यमंत्री व आमदार दत्तात्रय भरणे यांच्या प्रयत्नातून इंदापूरला घसघशीत निधी प्राप्त झाला आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा २ योजनेतून तालुक्यातील आठ रस्त्यांसाठी तब्बल १९ कोटी ४५ लाख मंजूर झाले आहेत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार व देवेंद्र फडणवीस तसेच खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रयत्नामुळे निधी मंजूर झाला आहे. मागील काही दिवसांपुर्वीच प्रधानमंत्री तसेच मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून आमदार भरणे यांनी कोट्यावधी रूपये आणले होते. त्यानंतर तीन महिन्याच्या आतच आठ रस्त्यांना मंजुरी मिळाल्याने तालुक्यातील रस्त्यांचा प्रश्न दत्तात्रय भरणे यांच्या चिकाटीमुळे मार्गी लागला आहे.

     इंदापूर तालुक्यातील आठ कामांकरिता २० किलोमीटरची लांबी मिळालेली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने बऱ्याच दिवसांपासून या रस्त्यांकरिता निधी मिळावा म्हणून आमदार दत्तात्रय भरणे प्रयत्नशील होते.

१)रामा १२० जांब ते छत्रपती हायस्कूल मानकरवाडी रस्ता लांबी ३.२०० किमीसाठी

३ कोटी २२ लाख रुपये, २) हिरेमठवस्ती नगरे मळा प्रजिमा-१९४ ते उंडेवस्ती बेलवाडी विद्यालय रस्ता लांबी १.९०० किमी १ कोटी ७२ लाख, ३) रामा १३२ काझड ते बाबुराव पाटील नंदिवाले वस्ती ते वडाचा मळा रस्ता लांबी ३.६०० किमी २ कोटी ६८ लाख, ४) रामा १२४ जंक्शन ते रुपनवर वस्ती आठदारे रस्ता लांबी १.९०० किमी १ कोटी ८० लाख, ५) रामा ६५ ते कुताळवाडी ते भाग्यनगर रस्ता लांबी १.६०० किमी १ कोटी ३३ लाख, ६) प्रजिमा १२५ शिरसोडी खामगळ वस्ती रस्ता लांबी २.२०० किमी २ कोटी ६७ लाख, ७) प्रजिमा १५९ रामकुंड ते अभंगवस्ती ते झगडेवाडी रस्ता लांबी २.८०० किमी ३ कोटी ४६ लाख, ८) काटी ते जाधववस्ती रस्ता लांबी २.८०० किमी २ कोटी ५३ लाख रुपये मंजूर झाले आहेत.

   आमदार दत्तात्रय भरणे बोलताना म्हणाले की, आमदार या नात्याने तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मी सातत्याने प्रयत्नशील असतो. आजपर्यंत आपण तालुक्यासाठी हजारो कोटी रूपये मंजूर करून आणले आहेत. विकासाची हिच गती चालू असून या रस्त्यांमुळे नागरिकांचे दळणवळण अजून सुलभ होणार असुन लवकरात लवकर सदरील कामांना प्रत्यक्षात सुरुवात होणार असल्याचे आमदार भरणे यांनी सांगितले.

---------------------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा