टेंभुर्णी( बेंबळे )--प्रतिनिधी मुकुंद -रामदासी
टाइम्स 45 न्यूज मराठी
मो.9960 202 630
25 लाख टन गाळप करणार, अधिकारी व कर्मचा-यांचा दिपावली बोनस बँकेत वर्ग
विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना लि.युनिट नं.1 पिंपळनेर येथील सन 2023-24 गळीत हंगामाचा 23 वा बॉयलर अग्निप्रदिपन समारंभ मंगळवार दि.26/09/2023 रोजी सकाळी 10 वा. विठ्ठल कॉर्पोरेशनचे संस्थापक चेअरमन आ.संजयमामा शिंदे यांचे शुभहस्ते व संस्थापक चेअरमन आ.बबनराव शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. तसेच युनिट नं.2 करकंब येथील 5 वा बॉयलर अग्निप्रदिपन समारंभ सोलापूर जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह शिंदे यांचे शुभहस्ते व व्हाईस चेअरमन वामनराव उबाळे यांचे अध्यक्षतेखाली कारखाना कार्यस्थळावर संपन्न झाला. बॉयलर अग्निप्रदिपन प्रसंगी संचालक सुरेश बागल व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.सुनिता बागल व संचालक पांडूरंग घाडगे व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.निलावती घाडगे यांच्या शुभहस्ते सत्यनारायण महापुजा पार पडली.
याप्रसंगी बोलताना संस्थापक चेअरमन आ.बबनराव शिंदे म्हणाले की, विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे युनिट नं.1 पिंपळनेर येथे मागील सन 2022-23 गळीत हंगामामध्ये 18 लाख 41 हजार 420 मे.टन ऊसाचे गाळप करून 11.33 टक्के साखर उता-याने 16 लाख 52 हजार 800 क्विंटल साखर पोती उत्पादीत केलेली आहेत. तसेच युनिट नं.2 करकंब येथे 5 लाख 28 हजार 285 मे.टन ऊसाचे गाळप करून 11.37 टक्के साखर उता-याने 5 लाख 22 हजार 745 क्विंटल साखर पोती उत्पादीत केलेली आहेत.
पुढील हंगाम 2023-24 साठी युनिट नं.1 पिंपळनेर येथे 35 हजार 355 हेक्टर ऊस क्षेत्राची ऊस नोंद झालेली आहे. युनिट नं.2 करकंब येथे 7 हजार 738 हेक्टर ऊस क्षेत्राची ऊस नोंद झालेली आहे. या हंगामामध्ये युनिट नं.1 कडे 20 लाख व युनिट नं.2 कडे 5 लाख मे.टन ऊस गाळप करण्याचे उद्दिष्ठ मा.संचालक मंडळाने निश्चित केले आहे. हंगाम 2023-24 मध्ये गाळप क्षमतेएवढा ऊस पुरवठा होण्याचे दृष्टीने आवश्यक ऊस तोडणी वाहतूकीसाठी बैलगाडी, ट्रक/ट्रॅक्टर व टायर बैलगाडीचे करार करणेत आलेले असून त्यांना धोरणानुसार ॲडव्हान्स वाटप करण्यात आलेला आहे.
कारखान्याचे प्रगतीमध्ये कामगारांचा मोठा सहभाग आहे. अधिकारी व कर्मचारी यांनी ऑफ सिझन मधील कामे चांगल्या पध्दतीने पूर्ण करून पुढील सन 2023-24 हंगाम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन याप्रसंगी त्यांनी केले. तसेच कारखान्याचे अधिकारी व कर्मचारी यांना दिपावली सणासाठी दोन पगार बोनस देणेत येणार असून त्यापैकी एक पगार बँकेत वर्ग करणेत आला असून उर्वरीत एक पगार दिपावली सणापूर्वी कर्मचा-यांना अदा करणेत येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
चालू वर्षी समाधानकारक पाऊस न झाल्याने त्याचा ऊस उत्पादनावर व गाळपावर परिणाम होणार आहे. कारखान्याचे दोन्ही युनिटची ऑफ सिझनमधील सर्व कामे पूर्ण झालेली असून गाळप हंगाम 10 ऑक्टोबर पासून सुरू करणेच्या दृष्टीने प्लॅन्ट तयार ठेवण्यात आलेला आहे. मागील पाच ते सहा दिवसापासून सर्वत्र कमी अधिक प्रमाणात पाऊस पडत असून समाधानकारक पाऊस झाल्यास पाण्याअभावी जळीत होणा-या ऊसास दिलासा मिळणार आहे. सन 2023-24 ऊस गाळप हंगाम शासनाच्या धोरणानुसार सुरू करणेत येणार असल्याचे त्यांनी याप्रसंगी सांगितले.
सदर प्रसंगी कारखान्याचे संचालक पोपट गायकवाड,प्रभाकर कुटे,रमेश येवलेपाटील,शिवाजी डोके,लक्ष्मण खुपसे, वेताळ जाधव, विष्णु हुंबे, लाला मोरे, सचिन देशमुख,पोपट चव्हाण, कार्यकारी संचालक एस.एन.डिग्रजे, युनिट नं.2 चे जनरल मॅनेजर एस.आर.यादव, सर्व जिप. व पं.स. सदस्य,मार्केट कमिटी सदस्य,आजी माजी पदाधिकारी, कार्यकर्ते, सभासद शेतकरी, ऊस पुरवठादार, कारखाना अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो..१) विठ्ठलराव शिंदे साखर कारखाना पिंपळनेर युनिट एक चा बॉयलर अग्नी प्रदीपन सोहळा आमदार बबनदादा शिंदे आमदार संजयमामा शिंदे व व इतर मान्यवर.
२) विठ्ठल शिंदे साखर कारखाना करकंब युनिट दोन येथील बॉयलर अग्नी प्रदीपन सोहळा जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष रणजीतभैय्या शिंदे उपाध्यक्ष वामनभाऊ उबाळे व इतर मान्यवर.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा