संपादक---- हुसेन मुलाणी
टाइम्स - 45 -न्युज मराठी
मो.9730 867 448
माळशिरस तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यात मागील एक महिन्यापासून १०० व ५०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरचा कृत्रिम तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक, विद्यार्थी, कारखानदारांना याचा फटका बसून त्रासही सहन करावा लागत आहे.
एखाद्या नागरिकांचा खरेदी विक्रीचा व्यवहार मोठा असेल आणि जर त्याकरिता ८ ते १० हजार रुपयांचा स्टॅम्प लागत असेल तर ५०० रुपयांच्या स्टॅम्प अभावी त्या नागरिकांना शंभर रुपयाचे ८० ते १०० स्टॅम्प जोडावे लागत आहेत. परंतू १०० च्याही स्टॅम्पचा तुटवडा असल्याने खरेद्या रखडावे लागत आहेत. त्यामुळे नागरिक तर त्रस्त होत आहेतच त्याचबरोबर मुद्रांक विक्रेता (स्टम्प व्हेंडरला) आणि लेखनिकला याचा त्रास होत आहे.
माळशिरस तालुक्यातसह सोलापूर जिल्ह्यात सततच्या मुद्रांकाच्या तुटवड्यास जबाबदार अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या नियोजनशून्य कारभाराचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे. सध्याला साखर कारखाना हंगाम सुरू होणार असल्याने करारासाठी, विद्यार्थ्यांना विविध कारणांसाठी, तसेच घरकुल, बॅक करार, कर्ज प्रकरणे आदिंसाठी स्टॅम्प गरजेचे असल्याने त्याच्या तुटवड्यामुळे नाहक भटकंतीची वेळ आली आहे.
सन 2023 मध्ये स्टॅम्प च्या संदर्भात वारंवार तक्रारी वाढत असताना सुद्धा वरिष्ठ अधिकारी याकडे दुर्लक्ष करत आहेत,
तसेच यासंदर्भात महाराष्ट्रातील इतर जिल्ह्याची माहिती घेतली असता सर्व जिल्ह्यात ५०० रुपयांचे स्टॅम्प उपलब्ध आहेत तर सोलापूर जिल्ह्यातच का नाहीत हा खरा संशोधनाचा विषय असून, सोलापूर जिल्ह्याला याबाबत सापत्न वागणूक मिळत असल्याचे बोलले जात आहे. सोलापूर जिल्हा कोषागार हे प्रभारी असून त्यांच्याकडे इतर विभागाचा अधिभार असल्याने जिल्हा मुद्रांक अधिकारी व कोषागार अधिकारी यांचेकडे साफ दुर्लक्ष होत असून कोषागार विभागातून मलाई मिळत नसल्याने दुर्लक्ष होत आहे का? असेही नागरिकातून बोलले जात आहे.
यासंदर्भात जिल्हा कोषागार अधिकारी यांच्या कडून उडवा उडवी ची मिळतात आम्ही मागणी केली असून वरूनच तुटवडा असल्याचे वारंवार उत्तर दिले जाते शिवाय ट्रेझरीकडे केवळ स्टॅम्प ठेवायचे असतात वितरणचे काम जिल्हा मुद्रांक अधिकारी यांच्याकडे असते.
मागील एक महिन्यापासून सोलापूर जिल्ह्यात १०० व ५०० रुपयांच्या स्टॅम्पचा तुटवडा दूर करून नागरिकांना होणाऱ्या त्रासापासून दिलासा द्यावा अशी मागणी होत आहे. शासकीय स्तरावरून याची चौकशी होऊन दोषी अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी शिवाय सोलापूर जिल्ह्याला सापत्न वागणूक देणाऱ्या अधिकाऱ्यांचीही चौकशी होऊन त्यांच्यावरही कारवाई करण्याची मागणी नागरिकातून होत असून सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि सोलापूर चे जिल्हाधिकारी हे याकडे लक्ष देतील काय?
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा