Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, ३ सप्टेंबर, २०२३

खरीप हंगाम धोक्यात.

 माळशिरस तालुक्यात खरीप हंगाम धोक्यात.

कडक उन्हाने पिके करपली; विहिरींनी गाठला तळ, बंधारे पडले कोरडे.


अकलूज (प्रतिनिधी)। लक्ष्मीकांत कुरुडकर. मो.7020665407

          समाधानकारक पाऊस पडेल, या आशेवर पुरंदर तालुक्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पिकांच्या पेरण्या काही प्रमाणात केल्या होत्या. मात्र, ऑगस्ट महिना संपला आला, तरी अद्याप पाऊसच पडत नसल्याने शेतकरीवर्ग

चिंताग्रस्त झाला आहे. पावसाने अशीच दडी मारली, तर पुढील काही दिवसांतच भीषण दुष्काळाचे सावट माळशिरस तालुक्यावर ओढावेल, असे मत जाणकार शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहे.

खरीप हंगामातील पिके पाण्याअभावी धोक्यात आल्याने तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. तसेच जनावरांसाठी हिरवा चारा उपलब्ध होणे म्हणजे तालुक्यात पर्वणीच ठरत आहे. चाराटंचाईमुळे पशुधन धोक्यात येऊ लागले आहे.

सध्या पावसाने दडी मारल्यामुळे खरीप हंगामातील पिकांना पाणी कमी पडू लागल्याने पिके जळून चालली आहेत. 

तालुक्यातील कांही भागात वाड्या-वस्त्यांवर मागील तीन महिन्यांपासून टँकरने पाणीपुरवठा होत आहे. गावातील विहिरींची पाणीपातळीही पूर्णपणे खालावल्याने पाण्याअभावी शेतकरी अडचणीत आलाआहे.

नीरानदी वरील वजरे येथील बंधारा कोरडा पडला आहे. ऐन पावसाळ्यात कोरडाठाक पडल्याने या परिसरातील पिके पावसाअभावी करपू लागली आहेत.

ऐन पावसाळ्यात कडाक्यांचे ऊन पडत असल्याने पाण्याअभावी सुकून चाललेली पिके करपू लागली आहेत. ऐन पावसाळ्यात कडक ऊन व सोसाट्याचा वारा वाहत असून, पुढेही पाऊस पडतो की नाही

  अशी परिस्थिती निर्माण झाल्याने खरीप हंगामातील पिकांना पाणी द्यायचे कुठून? असा प्रश्न निर्माण झाल्याने तालुक्यात दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे झाली आहे.

(चारा छावणी, टँकर

मागणीला जोर)

रब्बी हंगामातील १५ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर हा कालावधी ज्वारीच्या पेरण्याचा असतो. मात्र, ऑगस्ट महिना संपला तरी अद्याप

 तालुक्यात एकही दमदार पाऊस पडलेला नाही. त्यामुळे रब्बी हंगामात पेरणीसाठी लागणारे बियाणे, खते व यांची तयारी" तरी कशासाठी करावी? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. पाऊस नसल्याने दुष्काळाचे सावट उभे राहिले आहे. त्यामुळे चारा छावणीची मागणी आता जोर धरू लागली आहे तसेच पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची मागणी तालुक्यात होऊ लागली आहे.

 तालुक्यात दुष्काळाची परिस्थिती तयार झालीआहे.




                       जाहिरात प्रसिद्ध

FASTAG साठी संपर्क साधा. 8408817333 

सर्व प्रकारचे FASTAG काढून दिले जातील तसेच update करून घ्यायचा असेल तरी संपर्क साधावा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा