शहिद वजीर रास्ते यांच्या बलीदानाची प्रेरणा तरूणांनी घ्यावी - श्रीराज दत्तात्रय भरणे
इंदापूर तालुका----- प्रतिनिधी
एस बी तांबोळी,
मोबाईल -8378081147
इंदापूर तालुक्यातील शहिद वजीर रास्ते यांनी ऐन तारुण्यात देशासाठी कारगील युध्दात आपल्या प्राणाचे बलिदान दिले. त्यांच्या जिद्दीची व कार्याची प्रेरणा तरूणांनी घेवून कार्य करावे असे प्रतिपादन युवानेते श्रीराज दत्तात्रय भरणे यांनी केले.
ओझरे ( ता. इंदापूर ) येथील कारगील शहिद वजीर दत्तात्रय रास्ते यांच्या २४ व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त रक्तदान, भजन, माजी सैनिकांना आदरांजली वाहण्यात आली. तसेच यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
कारगील शहिद वजीर रास्ते यांच्या स्मारकातील पुर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी दि सासवड माळी शुगर फॅक्टरीचे चेअरमन रंजन गिरमे, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, बावडा औट पोस्टचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक जाधव, बीट हवालदार जाधव, पीएसआय भाग्यश्री जाधव रुपनवर, सिनेअभिनेते शिवकुमार गुंतवरे, उपसरपंच योगीता पवार, ग्रामसेवक गणेश लंबाते, वीरपिता दत्तात्रेय रास्ते, वीरमाता बायडाबाई रास्ते, गजेंद्र रास्ते, सोमनाथ रास्ते, नितीन रास्ते, दिलीप रास्ते आदीसह माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्रीराज भरणे पुढे म्हणाले, देशाच्या सीमेवरती चोवीस तास पहारा देणाऱ्या जवानामुळे आपण व आपला देश सुरक्षित आहे. आपण सजग नागरिक म्हणून त्यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन देशाप्रती कार्य करणे आवश्यक आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक नितीन रास्ते यांनी केले. सुत्रसंचलन विजय पाटील सर यांनी तर आभार भरत रास्ते यांनी मानले. यावेळी ज्ञानदीप ब्लड सेंटरच्या वतीने एकतीस रक्तदात्यांचे रक्तसंकलन करण्यात आले. रक्तदात्यांना सॅक, प्रमाणपत्र देण्यात आले.
फोटो - ओझरे येथील कारगील शहिद वजीर दत्तात्रय रास्ते यांना आदरांजली वाहण्यात आली.
---------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा