Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, ८ सप्टेंबर, २०२३

जन संवाद यात्रा

 मंगळवेढा तालुका काँग्रेस कमिटी च्या वतीने" जनसंवाद यात्रे "ला उत्स्फूर्तपणे सुरुवात

संपादक----हुसेन मुलाणी
टाइम्स 45 न्युज मराठी
मो.-9730 867 448



दि.७ सप्टेंबर २०२३

सन २०१४च्या पूर्वी आर एस एस भाजपा प्रणित सर्वच कट्टरवादी संघटनानी महागाई,बेरोजगारी,भ्रष्ठाचार यांनी जनता बेजार झाली आहे असे चित्र निर्माण करुन दिल्लीतील जंतर येथे आण्णा हजारे यांच्या आंदोलनाचे नियोजन केले.त्या संपूर्ण आंदोलनात पक्षाचे नाव कुठेही येणार नाही याची काळजी घेतली गेली. प्रसार माध्यमातून अतिरंजीत स्वरूप आंदोलना देण्यात आले आणि काँग्रेस पक्ष आणि नेतृत्व याविषयी भ्रम निर्माण करण्यात आला. आजही प्रसार माध्यम लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून काम करण्याऐवजी मोदी सरकारचे प्रवक्ते म्हणून काम करतात. महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार यांना देशातील जनता त्रस्त असून प्रसार माध्यम याकडे लक्ष न देता मोदीजी यांची भाटगिरी करतात. त्यामुळे मोदी सरकारचे अपयश जनते समोर पोहोचवण्यासाठी कॉग्रेस पक्षाने जन संवाद यात्रेचे आयोजन केले होते. सन २०१४ साली काँग्रेस मुख्य भारत करूअसे गर्जना करीत कॉग्रेस पक्षाचे नेतृत्व संपविण्यासाठी मा बेटे के सरकार परिवारवाद असे म्हणत काँग्रेस पक्षाला संपविण्याचा प्रयत्न कर्नाटक राज्यातील निवडणूक मध्ये आटोकाट प्रयत्न करून सुद्धा सोनियाजी,राहुलजी, मल्लिकार्जुन खर्गेजी,सिध्दरामहया, डी.के.शिवकुमार यांना मोदी, शहा यांच्या भाजपलाच संपविले तीच परस्थिती मध्यप्रदेश, राजस्थान, छतीसगड,आण तेलंगणा मध्ये भाजफची अवस्था होणार आहे. आज देशात मोदी पेक्षा राहुल गांधी जास्त लोकप्रिय झालेत.म्हणजे अन्य मार्गाने राहूल गांधी यांचे मार्गात आडकाठी आणण्यासाठी मोदी, शहा प्रयत्न करतात. याचाच एक भाग म्हणून राहूल गांधी यांना गुजरात मधील यंत्रणा वापरून राहुलजीनी

  १३ एप्रिल २०१९ रोजी लोकसभा निवडणुकीत कर्नाटक राज्यातील कोलार येथे प्रचार सभेत नीरव मोदी,ललित मोदी यांनी देशाचे कोट्यावधी रुपये बुडवून परदेशात पळून गेले. नीरव मोदी,ललीत मोदी, नरेंद्र मोदी या सर्व चोर लोकांची सरनेम मोदी कशी आहेत असा प्रचार सभेत प्रचार केल्याने गुजरात मधील सुरत येथील भाजपाचे पूर्णेस मोदी यांनी देशातील सर्व मोदी समाजाची मानहानी झाली म्हणून १६ एप्रिल २०१९ रोजी सुरत कोर्टात याचिका दाखल केल्याने २ मे २०१९ रोजी एफआयआर दाखल झला. १६ जुलै २०१९ रोजी राहुलजी सुरत कोर्टात हजर झाले. पुढे २९ आक्टोंबर २०२१ रोजी सुनवनी झाली.त्यांनंतर ७ मार्च २०२२ रोजी पूर्णेश मोदी यानी उच्च न्यायालयात माझ्याकडे पुरावे नाहीत म्हणून आपल्याच केसवर स्थगिती आणली. ७ फेब्रुवारी २०२३ रोजी राहुलजी यांनी गौतम आडनी यांच्या हिंडेन बर्ग रिपोर्ट चौकशी करण्यासाची मागणी केली. आडाणी यांच्या विषयी प्रश्न लोकसभेत विचारले.आडणी आणि मोदी यांनी परदेशात आडणी यांच्या विमानाने कितीवेळा प्रवास केला.आडाणी यांना किती देशात वीज निर्मितीसाठी कंत्राट मिळवून दिले.जगात ६०९ क्रमांकावर श्रीमंत असलेले गौतम आडाणी जगातील दूसऱ्या क्रमांकाने श्रीमंत कसे झाले. आणि दूसऱ्या बाजूला कोट्यवधी बेरोजगार यांना कवडी मिळत नाही. राहूलजीने देशातील बेसुमार बेरोजगारी, गगनाला भिडलेली महागाई,देशातील २३ कोटी जनता दारिद्र रेषेखाली गेली, शेतकरी यांचे उत्पादन दुप्पटीने, शेतमालाचे हामी भाव दीड्डपट, बहुत हुआ नारीपर अत्याचार अब की बार मोदी सरकार काळत परदेशातील काळा पैसाची वाढ झाली,जागतिक बाजर पेटेत क्रुड तेलाचे दर मर्यादित असताना डिझेल,पेट्रोल, गॅसचे वाढलेले दर आदी देशासमोरील ज्वलंत प्रश्नावर संसदेत आणि संसदेत बाहेर जनतेचा आवाज मोदी, शहा यांच्या ईडी, सीबीआय,आयटी निवडणूक आयोग आदी सरकारी संस्थेच्या ससेमिऱ्याला न घाबरता विरोधी पक्षाची भूमिका अत्यंत प्रभावीपणे मांडतात. एवढेच नव्हे तर देशातील जनतेचे ज्वलंत प्रश्न आणि समस्या जाणून घेण्यासाठी ७ सप्टेंबर २०२२ पासून कन्याकुमारी ते काश्मिर पर्यंत सुमारे ३५०० हजार किलोमीटर भारत जोडो पदयात्रा काढली. पदयात्रेत राहूलजीना उत्स्फूर्तपणे देशातील जनतेकढून प्रतिसाद मिळाला. राहूल गांधी देशातील स्वच्छ चारित्र्य असलेले निष्कलंक आपले वडील राजीव गांधी यांचे प्रमाणे प्रमाणिक अशी जनतेच्यामध्यें प्रतिमा निर्माण झाली. म्हणून राहुलजीना रोखण्यासाठी शहा मोदींनी आपल्या सवयीप्रमाणे वाम मार्गाने राहूल गांधी यांना रोखण्याचे उद्योग सुरु केले त्याचाच एक भाग म्हणून १० फेब्रुवारी २०२३ रोजी पूर्णेश मोदी यानी मोदी सरनेम मानहानी केसवर उच्च न्यायालयात आणलेली स्थगिती मागे घेतली. न्यायधीश म्हणून हरिश हसमुख वर्मा यांची बदली कोर्टात झाली. त्वरित सुनावणी होऊन २३ मार्च २०२३ रोजी राहुलजी यांना दोन वर्षाची शिक्षा दिली म्हणून त्यांचे लोकसभा सदस्यता २४ एप्रिल २०२४ लोकसभा सचीवने रद्द केले. मानहानीस भारतीय दंड संहिता ४९९ व ५०० प्रमाणे जास्ती जास्त दोन वर्षे शिक्षा आहे.हा कायदा देशात लागू झाल्यापासून फक्त राहूल गांधी यांना दोन वर्षे शिक्षा झाली. दोन वर्षे किंवा दोन वर्षापेक्षा जास्त शिक्षा झाल्यावर संसद सदस्य निष्काशित होते.अदखलपात्र मानहानी केसमध्ये राहूल गांधी यांचे संसद सदस्यत्व घालविण्यासाठी केलेला आटापिटा दिसतो. आपल्यावरील झालेल्या अन्याया विरुद्ध दाद मागण्यासाठी २ एप्रिल २०२३ रोजी राहुलजी यांनी महानगर सुरत न्यायालय येथे अर्ज करुन शिक्षेला स्थगिती मागितली. २० एप्रिल २०२३ रोजी सुरत सत्र न्यायाधीशने जामीन मंजूर केला परंतू शिक्षेला स्थगिती दिली नाही. म्हणून २५ एप्रिल २०२३ रोजी उच्च न्यायालयात अपील दाखल केले. सुनावनी पूर्ण होऊन निकाल त्वरित न देता बराच काळ राखून ठेऊन ७ जुलै २०२३ रोजी उच्च न्यायालयने अपील फेटाळून लावले. १५ जुलै २०२३ रोजी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली.२१ जुलै २०२३ रोजी सर्वोच्च न्यायालयाने गुजरात सरकार आणि पूर्णेश मोदी यांना नोटीस काढल्या. ४ आगस्ट २०२३ रोजी सर्वोच्चन्यायालयाने राहुलजी गांधी यांच्या शिक्षेला स्थगिती दिल्याने ७ आगस्ट २०२३ रोजी १३६ दिवसानी राहूल गांधी वाजत गाजत सोमवारी लोकसभेत आले आणि सर्वत्र राहूलजी यांची प्रशंसा झाली.आज देशातील बेरोजगार, गरीब, वंचित, पिडीत, शेतकरी, कामगार यांच्या आवाज म्हणून राहुलजी यांच्याकडे देशातील जनता पाहू लागली आहे. २०१४ मध्यें ज्या अपेक्षेने जनतेने मोदी यांना सत्तेवर आणले ती अपेक्षा भंग झली आहे.देशातील जनता मोदी शहा यांच्या कुतंत्राला कंटाळी असून जनतेला बदल हवा आहे.





        काँग्रेस पक्षाने गेल्या ७५ वर्षात देशाच्या विकासात मोलाची कामगिरी केली एवढेच नव्हे तर ज्या ज्या वेळी देशात काँग्रेसेतर सरकार सत्तेवर आली तेव्हा देशाची आर्थिक घडी बिघडली डॉ. मनमोहन सिंहजी यांनी अर्थमंत्री म्हणून पाच वर्षे आणि पंतप्रधान म्हणून दहा वर्षे जे काम केले तेव्हा बिघडलेली अर्थव्यवस्था सुधारित करून आर्थिक बळकटी आणली .मोदींनी नोटबंदी, चुकीच्या पद्धतीने लावलेली जीएसटी,कोणतीही पूर्वतयारी न करता अचानक लॉकडाऊन लावणे यामुळे देशाची अर्थव्यवस्था रसातळाला गेली आहे. मोदी सरकारने शेतकरी विरोधी तीन काळे कायदे शेतकऱ्यांच्या नव्हे तर भांडवलदार उध्योगपतीच्या हिताचे शेतकरी विरोधी काळे कायदे आणले होते. .याविरोधात शेतकऱी पूर्ण एक वर्षभर आंदोलन केले. आंदोलन काळात ७०० आंदोलक शेतकऱ्याना प्राण गमवून शहिद झाले.फार उशिरा काळे कायदे शेतकरी व राहुल गांधी यांच्या विरोधामुळे काळे कायदे मागे घेतले. मोदी सरकार गेली नऊ वर्षे झाली चूकीचे निर्णय घेऊन देशाचे नुकसान करीत आहे.           




         मोदीजी सांगतात एक आणि करतात दूसरे. म्हणून शेतकऱ्यांचा मोदीजीवर विश्वास नाही. सत्तेवर येण्याअगोदर महागाई कमी करणे, वर्षाला दोन कोटी नोकरी , शेतमालाचे दुप्पट हामी भाव, परदेशातील काळा पैसा आणून प्रत्येकाच्या बँके खात्यात १५ लाक जमा करणे, भ्रष्टाचार निर्मुलन,मिनिमम गव्हर्नमेंट मँक्सिमम गव्हर्नन्स इत्यादी खोठी आश्वासने पूर्ण न केल्याने दिलेला शब्द मोदीजी पाळत नाहीत अशी त्यांची प्रतिमा निर्माण झाली आहे. त्यामुळे जनतेचा मोदीजीवर विश्वास नाही. तसेच फ्रान्स कडून खरेदी केलेल्या राफेल लढाऊ विमान सौदा करताना फार मोठा घोटाळा करुन देशातील सर्वात मोठा भ्रष्टाचार केलाआहे. राफेल विमान घोटाळा चौकशी प्रामाणिकपणे करणाऱ्या सीबीआय निदेशक अलोक वर्मा यांना पहाटे दोन वाजता पदावरून हटवले व पिगॉसेस स्पायवेअरचा उपयोग करून त्यांची आणि त्यांच्या नातेवाईकांची जासूसी केली. तसेच प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेल्यानंतर प्रमुख न्यायमूर्ती रंजन गोगोई यांनी प्रकरण फेटाळून लावले म्हणून मोदी सरकारने त्यांना राज्यसभा सदस्य केले.            





           राफेल विमान खरेदी मध्ये घोटाळा झाला असल्याने फ्रान्स मध्ये नव्याने चौकशी सुरू आहे.त्याचप्रमाणे राफेल विमान खरेदी करार करताना अंबानी उद्योग समूहाला प्राधान्य देऊन भ्रष्टाचार केला आहे.काँग्रेस कालावधी मध्यें निर्माण केलेले सरकारी उद्योग कंपन्या, विमान तळ,बंदरे,विमान कंपनी, रेल्वे,कोळसा खाणी माती मोल किमतीने खाजगी उद्योगपतींना विकल्याने बेरोजगारी निर्माण झाली आहे.. त्यामुळे आडाणी सारखे उद्योजक जगात सहशे नऊ क्रमांकावरन दुसऱ्या क्रमांकावर मोदीजी यांच्या सत्ता काळात आले.यात फार मोठा भ्रष्टाचार झाला आहे. तसेंच पिगॉसेस स्पायवेअरचा वापर अतिरेकी देशद्रोही यांच्यासाठी करण्याऐवजी देशनिष्ट प्रमाणिक अधिकारी सत्यशोधक पत्रकार यांच्या साठी करून सत्य दडपण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. त्याचप्रमाणे कोरोना संसर्ग रोग हातळण्यात मोदी सरकार अपयशी ठरल्याने त्याकळात हजारो प्रेते औषधे आणि ऑक्सिजन न मिळाल्याने हजारो प्रेते गंगानदीत वाहुन गेली. मोदीजीना जगभरातील प्रसार माध्यमातून जबाबदार धरण्यात आले.एवढेच नव्हे तर जगभरातील देशानी भारताला कोरोना संकटात पाठविण्यात आलेली मदत साहित्य निष्क्रिय मोदी सरकारमुळे विमान तळावर पडून राहिली .               



     कोरोना या संसर्गजन्य साथ रोग वैज्ञानिक दृष्टिकोनातून उपाचार करून आटोक्यात आणण्या ऐवजी टाळी थाळी .मेनबत्ती दिवा विझविणे अशा अघोरी पध्दतीने अज्ञान, अंधश्रद्धा याला विणाकारण महत्त्व दिले गेले. भारताचा शत्रू चीन नेहमी डोकलाम,लडाक व अरूणाचल प्रदेश पूल बांधणे गावे वसविणे अशी कृत्य करून भारताची जमीन बळकावत असताना मोदी गप्प बसून आहेत. चीनचे नाव घेत नाहीत. एवढेच नव्हे तर चीन समाविष्ट असलेले प्राचीन, अर्वाचीन हे शब्द उच्चारायला मोदी घाबरतात.

म्हणून जनतेला काँग्रेस सरकार व मोदी सरकार याची तुलना करून काँग्रेसने गेल्या ७५ वर्षात अतिशय चांगल्या पध्दतीने सरकार चालवून

पोलिओ मुक्त भारत,माहिती अधिकार, शिक्षण अधिकार, भूमिअधिग्रहन, भोजनाचा अधिकार, दहा शहरात मेट्रो, मोबाईल इंटरनेट, शेतकरी कर्ज माफी, विधवा पेन्शन, मध्यान भोजन,मनरेगा, सहा कोटी रोजगार, लाखो अंगणवाडी,आदिवासीना जमीन पट्टे, वीस हजार किलोमीटर रेल्वे नवीन रेल्वे लाईन, सात नवे एम्स रूग्णालय, नव्वद कोटी आधार कार्ड, आठ कोटी नवीन गैस कनेक्शन, पासष्ट कोटी लोकांना दोन रुपयात अन्न अशी मोठी कामे करून देशाची प्रगती केली




 तर मोदींनी मोठमोठी भाषणे करू खोठी आश्वासने देऊन जनतेला भुलविले. देशाची प्रगती फक्त काँग्रेस सरकारच करू शकते हे लोकांच्या अनुभवाने सिध्द झाले आहे. काही मुख्य प्रवाह माध्यमे देश हिताचे रक्षण नकरता गोदी मिडिया बनून जनतेची दिशाभूल 

 आहेत . यामुळे देशातील जनतेकढून २०२४ सालच्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीत मोदी, शहा यांना त्यांची जागा दाखवली जाईल यात शंका नाही.

जनसंवाद यात्रेत सोलापूर जिल्हा काँग्रेस कमेटी अध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील ,महराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभाग उपाध्यक्ष तुकाराम माळी, मंगळवेढा तालुका काँग्रेस कमेटी अध्यक्ष प्रशांत साळे,मंगळवेढा तालुका काँग्रेस कमेटी ओबीसी विभाग अध्यक्ष पाडुरंग माळी, सुधीर लांडे, समीर कोळी, मंगळवेढा तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष मनोज माळी आदी उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा