छत्रपती शिवाजी महाराज यांचे बाबत इंस्टाग्राम वर आक्षेपार्ह पोस्ट टाकणारा खरा गुन्हेगार पोलिसांच्या ताब्यात मात्र दोन निष्पापांचा बळी गेला याला जबाबदार कोण ?
टाइम्स 45 न्युज मराठी नेटवर्क
सातारा जिल्ह्यातील पुसेसावळी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबत इंस्टाग्राम वरील आक्षेपार्ह पोस्टमुळे झालेल्या दंगलीत दोन निष्पापांचा बळी गेला असून एका तरुणाच्या द्वेष भावनेतून प्रकार घडल्याचा पोलीस तपासात निष्पन्न
गुन्ह्याबाबत सातारा पोलीस कडून मिळालेली थोडक्यात हकिकत अशी कि
सातारा शहर पोलीस ठाणे दिनांक १५/०८/२०२३ रोजी गुन्हा रजिस्टर नंबर ६४८/२०२३ भारतीय दंड संविधान कलम ५९५अ, १५३३, ५०४ प्रमाणे गुन्हा दाखल झालेला होता. सदर गुन्ह्यामध्ये विधीसंघर्ष बालक नामे अरमान राजासाब शेख याचे nobixx७० या इस्टाग्राम अकौंटवरुन छत्रपती शिवाजी महाराज यांचे नावाने आक्षेपार्ह पोस्ट (इस्टाग्रमा स्टोरी) प्रसारीत झालेबाबत नमुद केले होते. सदर गुन्ह्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखा (CIU युनिट) सातारा यांचे पथकाने विधीसंघर्ष बालक नामे अरमान राजासाब शेख यांचे nobixx_७० या इस्टाग्राम अकोटबाबत तांत्रिक माहिती इस्टाग्राम यांचेकडुन प्राप्त करून घेतली. सदर माहितीचे तांत्रिक विश्लेषण केले असता सदर माहितीमधुन अमर अर्जुन शिंदे राहणार मु. पो. हिवरे ता. कोरेगांव जिल्हा सातारा याची माहिती निष्पन्न झाली आहे.
सदर गुन्ह्याचे अनुषंगाने संशयीत अमर शिंदे यास पोलिसांनी विश्वासात घेवून विचारपुस केली असता अमर शिंदे हा त्याचे इस्टाग्राम अंकोटवरुन मैत्रिणीसोबत इंस्टाग्राम चॅटिंग करीत होता. सदर मैत्रिण हि विधीसंघर्ष बालक नाम अरमान राजासाब शेख यांचेसोबत देखील इस्टाग्रामवर संपर्कात होती. त्याचा राग मनात धरून आरोपी अमर शिंदे याने इस्टाग्रामावर आरोहि या महिलेच्या नावाने बनावट इस्टाग्राम अकौंट तयार करुन सदर अकौंटवरुन विधीसंघर्ष चालक नामे अरमान राजासाब शेख याचे सोबत चॅटिंग करू लागला. सदर अकौँटवरुन चॅटिंग करत असताना आरोपीने विधीसंघर्ष बालक नाम अरमान राजासाब शेख याचा विश्वास संपादन करुन त्याचेकडुन त्याचे nobixx_७० या इस्टाग्राम अकोटचा आयडी व पासवर्ड प्राप्त करुन घेतला. त्यानंतर आरोपी नामे अमर शिंदे याने विधीसंघर्ष बालक नामे अरमान राजासाब शेख यास लोकांनी शिवीगाळ करावी, त्याची बदनामी व्हावी, त्यास शिक्षा मिळावी व तो त्याचे मैत्रिणीपासुन दुर व्हावा या हेतुने दिनांक १५/०८/२०२३ रोजी छञपती शिवाजी महाराज यांचे नावाने आक्षेपार्ह पोस्ट (इस्टाग्रमा स्टोरी) nobixx ७० या इस्टाग्राम अकोटवरुन प्रसारीत केली.
सदर गुन्ह्याचे तांत्रिक विश्लेषन करीत असताना विधीसंघर्ष बालक नामे अरमान राजासाब शेख याचे nobixx_७० या नावाचे इस्टाग्राम अकौंट हे आरोपी नामे अमर अर्जुन शिंदे राहणार मु. पो. हिवरे ता. कोरेगांव जिल्हा सातारा हा वापरत असलेबाबत माहिती इस्टाग्राम व मोबाईल कंपनी यांनी दिलेले माहितीचे तांत्रिक विश्लेषण करून प्राप्त झाली आहे.
केवळ द्वेष भावनेने केलेले कृत्य हे समाजातील जातीय सलोखा बिघडवणारा असून समाजात दरी निर्माण करणारे अशा युवकांना समुपदेश करणे समाजातील प्रत्येकाचे काम आहे जेणेकरून आपल्या समाजात असे कृत्य घडणार नाही.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा