Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, २० सप्टेंबर, २०२३

मुस्लिम समाजाच्या वतीने निषेध करुन उपविभागीय अधिकारी यांना दिले निवेदन.

 पुसेसावळी जि.सातारा येथील मुस्लिम समाजावर झालेल्या अन्याया विरुध्द माळशिरस तालुका मुस्लिम समाजाच्या वतीने निषेध करुन उपविभागीय अधिकारी यांना दिले निवेदन.


अकलुज --प्रतिनिधी

शकुर तांबोळी  

टाइम्स 45 न्युज मराठी

मो.9860 112351

                      पुसेसावळी ता.खटाव जि.सातारा येथील झालेल्या मुस्लिम समाजातील दंगल पिडीतांना नुकसान भरपाई व न्याय मिळवून देणेबाबत व दंगेखोरांवर कडक कायदेशीर कारवाई करणेबाबत.आज दि.20 सप्टेंबर 2023 रोजी माळशिरस तालुका मुस्लिम समाज व अकलूज शहर मुस्लिम समाजाच्या वतीने उपविभागीय अधिकारी अकलूज यांना निवेदन देण्यात आले

या प्रसंगी माळशिरस तालुक्यातील मुस्लिम समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तसेच याप्रसंगी हजरत टिपू सुलतान यंग ब्रिगेड संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने ही उपविभागीय अधिकारी अकलूज यांना निवेदन देण्यात आले हे दोन्ही निवेदन व्ही आर देसाई मॅडम त्यांनी स्वीकारले असून या निवेदनात

समस्त माळशिरस तालुका मुस्लिम समाज व अकलूज शहर मुस्लिम समाजातर्फे विनंती पूर्वक निवेदन सादर करतो की, मौजे पुसेसावळी ता. खटाव जि. सातारा येथे झालेल्या दंगलीमध्ये निष्पाप दोघांचा बळी गेला आहे अनेकांचे संसार उध्वस्त झालेले आहे त्यांना अद्याप शासनाकडून कोणत्याही प्रकारची मदत अथवा सात्वन केले गेले नाही. यामुळे संपूर्ण भारतासह महाराष्ट्रातील मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. सदर घटनेचे तीव्र पडसाद दिसून येत आहेत. आम्ही सदर जाणीवपूर्वक घडवून आणलेल्या दंगलीच्या घटनेचा या निवेदनात जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला आणि या निवेदनाद्वारे पुढील मागण्या करण्यात आले



१) या दंगलीमध्ये मृत्युमुखी पडलेल्या तरुण मुस्लिम बांधवांच्या कुटूंबीयांना १० लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी. २) दंगलीमध्ये जखमी झालेल्या बांधवांना रक्कम रुपये ५ लाख नुकसान भरपाई द्यावी.


३) दंगलीमध्ये बांधवांची झालेल्या दुकानांची व घरांची तात्काळ पंचनामा


करून त्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई द्यावी. ४) दंगल घडविण्यामध्ये हात असणा-या दोषी व्यक्तींवर कठोरात कठोर शासन करण्यात यावे.


५) यापुढे होणा-या सोशल मिडीयावर हॅक करून मुस्लिम बांधवांना टार्गेट केले जाते. त्यामध्ये सायबर क्राईम मार्फत सोशल मिडीयावर नजर ठेवून अशा पोस्ट हॅक करणा-या व्यक्तींवर जास्तीत जास्त कडक कायदेशीर करणेत यावी.

 

६) यापुढे महाराष्ट्रातील प्रत्येक मशिदींना पोलिस संरक्षण देणेत यावे जेणेकरून मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या जाणार नाहीत तसेच यापुढे असे प्रकार घडू नये.


७) मयत व्यक्तींच्या घरातील एका सदस्यास शासकीय नोकरीत समाविष्ठ करून घेण्यात यावे व त्याचे कुटूंबास न्याय द्यावा.


८) तसेच अशा शांतता भंग करणा-या समाजकंटकांच्या वेळीच बंदोबस्त करणेत यावा. जेणेकरून महाराष्ट्रात अशा प्रकारच्या घटना घडणार नाही. यासाठी ठोस उपाययोजना करणेत यावी.


तरी वरील बाबींचा आपण गांभीर्यपूर्वक विचार करून, दंगलीची चौकशी करून संबंधितांवर कडक कायदेशीर कारवाई करावी व महाराष्ट्रातील मुस्लिम समाजाला न्याय द्यावा असे निवेदनात म्हटले आहे

माहितीस्तव या निवेदनाच्या प्रती देशाच्या राष्ट्रपती ,महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गृहमंत्री देवेंन्द्र फडणवीस ,उपमुख्यमंत्री अजित दादा पवार , पोलीस महासंचालक मुंबई, विशेष पोलीस महानिरीक्षक -कोल्हापूर, जिल्हाधिकारी -सोलापूर, पोलीस अधीक्षक -सोलापूर( ग्रामीण) इत्यादी ना पाठवण्यात आले आहेत







कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा